Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

फाल्गुन हा शालिवाहन शक वर्षातील शेवटचा महिना असून वसंत ऋतूची चाहूल देणारा अत्यंत उत्साहपूर्ण कालखंड मानला जातो. फाल्गुन महिन्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 16, 2026 | 03:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • फाल्गुन महिन्याची सुरुवात कधी होत आहे
  • फाल्गुन महिन्याचे पूर्वीचे नाव
  • फाल्गुन महिन्याचा इतिहास आणि महत्त्व
 

 

फाल्गुन हा शालिवाहन शके वर्षातील शेवटचा महिना. तसे पाहिले तर 12 मास आणि सहा ऋतूंचे सोहळे साजरे करताना दिवस कसे सरतात हे समजत नाही, पण शेवटच्या महिन्यातील हा शेवटचा ऋतू आपल्याला हवाहवासा असतो. बदलत्या ऋतुपर्वात येणाऱ्या या महिन्याला वसंतोत्सवाचा महिना म्हणून ओळखले जाते. एकीकडे सरती थंडी आणि हलकेच जाणवणारी उन्हाची चाहूल असते. तसेच धार्मिकतेतूनही या महिन्याचे पावित्र्य वेगळे ठरते.

पूर्वी होते ‘हे’ नाव

फाल्गुन या महिन्याला पूर्वी तपस्य या नावाने ओळखत असत, या महिन्यात दररोज रात्रीच्या प्रारंभी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पूर्वेला उगवते तसेच या महिन्यात पौर्णिमेला चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रापाशी असतो म्हणून या महिन्याला फाल्गुन हे नाव प्राप्त झाले.

या महिन्यात विष्णूला संतुष्ट करण्यासाठी तांदूळ, गाथ, कृष्णाजिन्न, वस्त्रे यांचे दान देण्याची प्रथा आहे. स्कंद पुराणात पुरुषांनी या काळात एकभुक्त राहावे असे सांगितले आहे. या दिवशी भाविक पलंग किंवा बिछाना दान देतात.

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

महिन्याचे प्रकार

फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन व भाव फाल्गुन आदी प्रकार असतात. अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला, तर नकुल-सहदेव यांचे जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावास्येच्या दिवशी झाले. फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला आमलकी एकादशी आणि कृष्ण एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात.

महिन्यातील सणोत्सव

फाल्गुन पौर्णिमा

होलिकोत्सव किंवा होळी हा या अखेरच्या महिन्यातला अखेरचा सण या महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. उष्णतेची तीव्रता कमी व्हावी म्हणून अग्निदेवतेचे हे केलेलं पूजन होय. होळी म्हणजे प्रज्वलित अग्नी. हा होलिकोत्सव म्हणजे सर्व वाईट गोष्टीचा नाश.

वाईटाची आहुती

या वर्षातील सर्व जुनेपाने, वाईट अनुभव, वाईट गोष्टी या अग्नीत जाळून नष्ट करायच्या, भस्मसात करायच्या असाही दृष्टिकोन या सणाच्या बाबतीत ठेवायला हरकत नाही. संपूर्ण वर्षातील चांगले जतन करायचे व वाईटाची आहुती द्यायची. हा अग्नी सर्व वाईट आत्मसात करतो व त्यांचा नाश करतो. अशुद्ध वातावरण शुद्ध करतो. प्रदूषण नाहीसे करतो.

महोत्सवांचे आयोजन

या महिन्यात भारताच्या विविध भागांत वेगवेगळे महोत्सव आयोजित होत असतात. देवळांमध्ये फाल्गुन मासानिमित पूजा-अर्चना संपन्न होतात, फाल्गुन शुक्ल अष्टमीला लक्ष्मीची म्हणजेच सीतेची पूजा केली जाते. फाल्गुनी पौर्णिमेला फाल्गुन नक्षत्र असेल तर हा दिवस विशेष शुभ मानला जातो.

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

उत्तिर नामक महोत्सव

दक्षिण हिंदुस्थानात फाल्गुन पौर्णिमेला उत्तिर नामक महोत्सवाचे आयोजन केले जाते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: फाल्गुन महिना कोणत्या कालगणनेतील शेवटचा महिना आहे?

    Ans: फाल्गुन हा शालिवाहन शक वर्षातील शेवटचा महिना मानला जातो. या महिन्यानंतर चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते.

  • Que: ‘फाल्गुन’ हे नाव कसे पडले?

    Ans: या महिन्यात पौर्णिमेला चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्राजवळ असतो. तसेच रात्रीच्या प्रारंभी हे नक्षत्र पूर्वेला उगवते. त्यामुळे या महिन्याला ‘फाल्गुन’ असे नाव प्राप्त झाले. पूर्वी याला ‘तपस्य’ असेही म्हणत.

  • Que: फाल्गुन महिन्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हा महिना व्रत, दानधर्म आणि पूजा-अर्चनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. विष्णूला संतुष्ट करण्यासाठी तांदूळ, वस्त्रे इत्यादींचे दान करण्याची परंपरा आहे. काही धर्मग्रंथांत या काळात एकभुक्त राहण्याचा उल्लेख आढळतो.

Web Title: Falgun month 2026 last month falgun history and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • dharm
  • month
  • Religion

संबंधित बातम्या

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
1

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या
2

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
3

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
4

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.