
ज्योतिषानुसार घरात सतत पूजा, मंत्र, दीप आणि शुद्ध वातावरण यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे नारळाला चांगला कोंब येतो असं म्हणतात. जर नारळाला कोंब फुटला तर घरावर कुलदैवताची कृपा आहे असं म्हटलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, कोंब आलेला नारळ समृद्धी, आर्थिक वाढ आणि घरातील प्रगतीचे प्रतीक मानला जातो. नारळाला कोंब येणं शुभ असून आर्थिक उन्नती होण्याचे देखील संकेत आहे असंही समजलं जातं.
नारळाला कोंब येणं जरी शुभ शकुन असला तरी देवघरात कोंब आलेला नारळाने काहीशी अडचण होते. आता या नारळाचं करावं काय असा प्रश्न पडतो. नारळाला कोंब आल्यावर त्या नारळाला मोकळ्या जागेत लावावं. त्याची योग्यरित्या वाढ होईल अशी काळजी घ्यावी. नारळाला कोंब येणं हा शुभशकुन मानला जातो त्यामुळे याला शेतात रुजवणं चांगलं मानलं जातं. मात्र शहरात मोकळी जागा किंवा शेतात कोंब रुजवणं अवघड होतं त्यामुळे तुम्ही याला तुमच्या बाल्कनीत देखील लावू शकता. त्यासाठी तुमच्याकडे मातीची कुंडी असणं आवश्यक आहे. बाल्कीत नारळाचा कोंब लावण्यासाठी माती, शेणखत यांचा देखील समावेश करा. त्याबरोबर मातीचं थोडंस खडेमीठ देखील टाकावं. कोणत्याही प्रकारे किड लागू नये यासाठी भीमसेनी कापूरची पूड टाकावी. असं केल्याने नारळ चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते.
पूजा करताना ठेवलेला हा नारळ दीर्घकाळ तसाच राहिला तर त्यात नैसर्गिक बदल सुरू होतात. नारळाच्या कडक अशा आवरणातून कोंब येतो. उष्णता, ओलावा आणि हवेमुळे नारळात अंकुर येण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असून .याचा शकुन किंवा अपशकुनाशी काहीही संबंध नाही. थंडीच्य़ा दिवसात मात्र हवा कोरडी असल्याने त्यात ओलावा नसतो आणि नारळ तडकतो. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहायचं झालंच तर नारळाला कोंब येणं किंवा तडकणं हे ऋतुचक्रावर अवलंबून आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्योतिषानुसार हे बहुतेक वेळा शुभ लक्षण मानतात. घरात सकारात्मक ऊर्जा सक्रिय झाल्याचे संकेत म्हणून पाहिले जाते.
Ans: अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की कोंब म्हणजे समृद्धी, आर्थिक प्रगती आणि घरातील वाढ यांचे प्रतीक आहे.
Ans: पूजेत ठेवलेला नारळ साधारणतः ८–१५ दिवसांत किंवा वाळायला सुरू झाल्यावर बदलणे योग्य.