देवपूजा सकाळी कोणत्यावेळी करावी? काय सांगतं धर्मशास्त्र, जाणून घ्या..
हिंदू धर्मात देवपूजेला अनंन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. देवीदेतांच्या विधीवत पूजा केल्याने देवता प्रसन्न होतात अशी श्रद्धा मानली जाते. असं म्हणतात की देवपूजेमुळे नकारात्नक शक्ती आपल्या आसपास देखील फिरकत नाही. हिंदू शास्त्रानुसार सकाळी ब्रम्हमुहुर्तावर पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. ही देवपूजा कधी आणि कशी करावी याबाबत ज्योतिषशास्त्र काय म्हणतं ते जाणून घ्या..
हिंदू धर्मशास्त्रानुसार ब्रम्हमुहुर्तावर केलेल्या देवपुजेने देव प्रसन्न होतात. ब्रम्हमुहुर्त म्हणजे पहाटेचे तीन ते पाच यावेळेत देवपूजा केल्याने घरातील नकारात्नकता दूर होते आणि सकाळी लवकर उठल्यामुळे अध्यात्निक ऊर्जा जास्त वाढते असं म्हटलं जातं. सकाळी कधी आणि कोणत्या वेळेला देवपूजा करावी याबाबत ज्योतिषशास्त्रात सांगितले की, सकाळी ब्रम्हमुहुर्तार पहाटे पाच पर्यंत पहिली देवपूजा करावी . त्यानंतर दुसरी देवपूजा ही सकाळी नऊ वाजेपर्य़ंत करावी. त्यानंतर मधल्या वेळेत दुपारी बारा वाजेपर्यंत देवपूजा करावी. त्यानंतर संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी साडेचार ते सहा या वेळेत देवपूजा करणं शुभ असतं तर रात्री नऊ वाजेपर्यंत देवतांची पूजा करणं ज्योतिषशास्त्रात मान्या दिली आहे.
त्याचबरोबर हिंदूशास्त्र असं देखील सांगतं की, देवपुजेप्रमाणेच तुम्ही ध्यानसाधना करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. असं मानलं जातं की. दिवसातून किमान पाच वेळा तरी नामस्मरण करणं गरजेचं आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक नैराश्य अनेकांना येतं त्यामुळे अध्यात्मिक मार्गाने म्हणजे नामस्मरण आणि ध्यानधारणेमुळे मनशांति मिळण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून किमान पाच वेळा देवाची आराधना केल्याने मानसिक शांतता लाभते.
देवपूजा करताना स्वच्छ अंघोळ करणं गरजेचं आहे. तसंच बिना अंघोळीचं देवघरातील पूजेच्या साहित्याला हात लावू नये असं सांगितलं जातं. याच कारण म्हणजे आपण शरीराने आणि मनाने देवाची पूजा करताना स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्यामुळे अंघोळ करुनच देवघरात प्रवेश करावा.
त्याशिवाय देवघरात सकाळी आणि संध्याकाळी पूजा करताना शंख वाजवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं.देवपूजा करताना शंख वाजवल्याने कुलदैवातांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जातं.
संध्याकाळच्या वेळी देवतांना पूजा करताना फूल अर्पण करणं महत्त्वाचं आहे. तसंच सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणेही वर्ज्य मानले जाते. त्यामुळे पूजेदरम्यान तुळशीची पाने अर्पण करू नयेत. असे केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्याशिवाय संध्याकाळी पूजा करताना सूर्यास्ताच्या एक तास आधी आणि सूर्यास्तानंतर एक तास ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. संध्याकाळची पूजा रात्री कधीही करू नये. असे केल्याने देवतांचा कोप होतो, ज्यामुळे आर्थिक संकट येऊ शकते. असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.