फोटो सौजन्य- istock
वास्तुशास्त्राला चिनी भाषेत फेंगशुई असे म्हटले जाते. फेंगशुईमध्ये पाणी, आग, पृथ्वी, लाकूड आणि धातू यांना पंचतत्व समजले जाते. फेंगशुईशी संबंधित अनेक टिप्स जीवनात आनंद, समृद्धी आणि आरोग्याचे घटक मानल्या जातात. असे मानले जाते की, क्रिस्टल बॉल, मत्स्यालय, कारंजे, बासरी, मेरिडियन डक, फेंग शुई फ्रॉग, लाफिंग बुद्धासह फेंगशुईची संबंधित काही अशा वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. फेंगशुईनुसार, घरामध्ये बागुआ आरसा लावणे देखील खूप शुभ मानले जाते. बागुआ आरसाशी संबंधित काही टिप्स जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या
बागुआ आरसा काय असतो
बागुआ ग्लास हा एक विशेष प्रकारचा काच आहे. ज्याचा आकार अष्टकोनी आहे, म्हणजे आठ कोन असलेला असतो. त्याला एकूण 8 कडा आहेत. या 8 कडांवर तीन-तीन रेषा असतात त्यापैकी काही तुटलेले आणि काही पूर्ण अशा रेषा असतात. पूर्ण रेषांना यांग आणि तुटलेल्या रेषांना यिन असे म्हटले जाते. बगुआ आरशाला कोणतेही केंद्र नसते. फेंगशुईनुसार, बागुआ आरसा बेडरुमच्या दरवाजावर लाल धाग्याने बांधून लावले जाते. हे लावल्याने रुममध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचार करते.
हेदेखील वाचा- घराचा हा कोपरा पिवळ्या रंगाच्या वस्तूंसाठी आहे शुभ, आर्थिक लाभ होण्याची शक्यता
घरामध्ये बागुआ आरसा लावण्याचे फायदे
असे म्हटले जाते की, बागुआ आरसा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते.
वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठीही बगुआ आरसा फायदेशीर मानला जातो.
घर त्रिखंड, छेदनबिंदू किंवा दक्षिण दिशेला असेल तर बगुआ आरसा लावणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.
याशिवाय फेंगशुईमध्ये मुख्यदरवाजावर पाकुआ आरसा लावणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की, मुख्यदरवाजावर पाकुआ आरसा लावल्याने वास्तूदोष दूर होतो. याला मुख्यदरवाज्याच्या मध्यभागी लावावे.
बागुआ आरशाचे फेंगशुई नियम
बागुआ आरसा घरी लावला असेल तर वास्तूच्या काही नियमांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
बागुआ आरशाला कधीही खराब ठेवू नये, वेळोवेळी साफसफाई करत राहावे.
जर बागुआ आरसा तुटलेला असेल, तर लगेच नीट करुन घ्या.
या आरशाला कधीही घराच्या आत किंवा ऑफिसमध्ये लावू नये.
बागुआ आरसा खरेदी करताना या गोष्टीकडे लक्ष द्या की, फ्रेमचा रंग निळा, काळ, लाल आणि गुलाबी असू नये.
हा आरसा नेहमी हिरवा, पांढरा, आकाश निळा किंवा फक्त पांढरा रंगातच खरेदी करावा.