
फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 20 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजा बुध ग्रहाने ज्येष्ठ नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे. हे संक्रमण सकाळी 6 वाजता झाले आहे ज्यावेळी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये होता. आता तो 29 डिसेंबरपर्यंत ज्येष्ठ नक्षत्रात राहणार आहे. या काळात बुध आपले संक्रमण करणार आहे. 2025 पर्यंत वृश्चिक राशीत आणि ज्येष्ठ नक्षत्रात राहणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाच्या संक्रमणाचा मानवी जीवनावर विविध प्रकारे परिणाम होताना दिसून येतो. बुध ग्रह हा विचार, संवाद, त्वचा, व्यवसाय आणि नशीब यावर परिणाम करतात. नवीन वर्षांच्या संक्रमणापूर्वी बुध ग्रहाचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या
बुध राशीच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात करिअरच्या संबंधित समस्या दूर होतील. तसेच तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमच्या विरोधकांना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. याव्यतिरिक्त तुम्हाला आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल. तुमचे नाते मजबूत करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. करिअरच्या क्षेत्रात उत्तम नोकरीच्या संधी प्रदान करू शकते. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.
2025 मधील शेवटचे काही दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहणार आहे. या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. बुद्धिमत्तेद्वारे आणि कौशल्याने शत्रूंना पराभूत करण्यास मदत करतो.
मिथुन आणि धनु राशींव्यतिरिक्त बुध संक्रमणाचा मीन राशीच्या लोकांना सर्वांत जास्त फायदा होणार आहे. तुमच्या त्वचेच्या कोणत्याही समस्या दूर होतील. तसेच या काळात तुमचे आरोग्यदेखील सुधारु शकते. जे लोक अनेक वर्षांपासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळेल, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बुध ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्याला बुध गोचर म्हणतात. बुध हा बुद्धी, संवाद, व्यापार, शिक्षण आणि व्यवहारांचा कारक मानला जातो
Ans: बुध आणि संबंधित ग्रहयोग अनुकूल असल्यामुळे निर्णयक्षमता वाढेल, अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नवे आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Ans: व्यापार, लेखन, मीडिया, मार्केटिंग आणि आयटी क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होईल. छोट्या गुंतवणुकीतून लाभ होण्याचे संकेत आहेत.