फोटो सौजन्य- pinterest
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्त्म राहणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि राहू त्यांना धार्मिक कार्यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली करिअरची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. ज्यांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. परदेशी काम, ऑनलाइन कमाई आणि तंत्रज्ञानातही नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. या काळात व्यवसायामध्ये अपेक्षित वाढ होईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्राचे संक्रमण सहाव्या घरात होत आहे. या काळात, शत्रू आणि विरोधकांची संख्या वाढू शकते. तुम्ही त्यांच्यावर मात कराल आणि पूर्वीपेक्षाही अधिक बलवान व्हाल. कोणतेही प्रलंबित न्यायालयीन खटले किंवा कायदेशीर प्रकरणे यशस्वी होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. राजकारणात गुंतलेल्यांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्तम राहणार आहे. राहूच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या आर्थिक समस्या कमी होतील आणि त्यांच्या व्यवसायात जलद वाढ होईल. तूळ राशीच्या लोकांना गुंतवणूक आणि बचतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते आणि नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुंबामध्ये होत असलेले मतभेद कमी होऊ शकतात. विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या या लोकांना फायदा होऊ शकतो. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. आरोग्याच्या समस्या सोडवल्या जाऊ नका.
धनु राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्तम राहणार आहे. राहूच्या शुभ प्रभावाचा परिणाम या राशीच्या लोकांवर होणार आहे. आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल राहणार आहे. नवीन वर्षात तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. कायदेशीर बाबींमध्ये गुंतलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप सामान्य राहणार आहे. व्यवसाय किंवा करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळू शकतात. रिअल इस्टेट आणि कौटुंबिक सुसंवादातही तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होईल. नोकरी किंवा पदात अचानक बदल होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: 2026 मध्ये राहू ग्रह आपली रास बदलणार आहे. या गोचराचा प्रभाव दीर्घकाळ राहतो आणि करिअर, पैसा, नाती व मानसिक स्थितीवर स्पष्टपणे दिसून येतो.
Ans: 2026 मध्ये मिथुन राशीसह काही निवडक 5 राशींवर राहू विशेष प्रभाव टाकेल. या राशींच्या लोकांचे नशीब चमकण्याचे आणि अचानक लाभ होण्याचे योग आहेत.
Ans: मिथुन राशीसाठी 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरू शकते.






