
फोटो सौजन्य- pinterest
27 नोव्हेंबर वाणी आणि बुद्धिमत्तेचा बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये उद्य होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. ज्यावेळी बुध ग्रह उदियमान अवस्थेत असतो त्यावेळी त्याचा प्रभाव करिअर, व्यवसाय आणि संवादावर दिसून येतो. त्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर होतो तर काही राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव होत नाही. तसेच कामातील अडथळे देखील दूर होतात. बुध ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदे होणार आहेत ते जाणून घेऊया
मेष राशींच्या लोकांसाठी नवीन बदल खूप फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही नवीन व्यवसायात करार करु शकता. या काळात तुम्हाला तुमच्या लेखन कारकिर्दीतही लक्षणीय यश मिळू शकेल. भूतकाळातील बाबींवरून मित्रांसोबत असलेले मतभेद संपतील. तुमचा आत्मविश्वास जनतेमध्ये वाढेल. परदेशात आणि इतर राज्यांमध्ये तुमचा व्यवसाय वाढविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जुने मतभेद दूर होतील. तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
तूल राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात तुम्ही नवीन वाहन आणि घराची खरेदी करु शकता. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांवर मोठी जबाबदारी येऊ शकते. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने ते नवीन काम सुरू करतील. या काळात लेखन, विपणन आणि विक्री क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संवाद प्रभावी राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वासही मजबूत होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि त्याचा फायदा देखील होईल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ समस्यांनी भरलेला राहील. वैवाहिक समस्यांना तोंड देणाऱ्यांना दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील. या काळात तुम्ही नवीन काम सुरू कराल. तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील. तुम्ही मित्रांसोबत गुंतवणूक योजनेचा भाग असाल. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. परीक्षेतील चांगले निकाल तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत पुढे नेतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बुध ग्रहाचा उदय 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे
Ans: बुध ग्रहाच्या उद्याने काही राशीच्या लोकांचे नशीब चमकेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील
Ans: बुध ग्रहाच्या उदयाचा मेष , कुंभ आणि तूळ राशीच्या लोकांवर परिणाम होईल