फोटो सौजन्य- pinterest
चंद्रदेवाने आज सोमवार, 16 जून रोजी मकर राशीत असताना श्रावण नक्षत्रातून धनिष्ठा नक्षत्रामध्ये आपले संक्रमण केले आहे. ग्रहांचा सेनापती असलेला मंगळ हा धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मानला जातो. हा ग्रह आत्मविश्वास, धैर्य, नेतृत्व क्षमता, भावना इत्यादींशी संबंधित असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांनी मकर रास सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवार, 17 जून रोजी चंद्रदेव पहाटे 1 वाजून 13 मिनिटांपर्यंत धनिष्ठ नक्षत्रात राहणार आहे.
ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या वेळी चंद्र एखाद्या विशिष्ट राशी आणि नक्षत्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याचा परिणाम आपल्याला सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. असे म्हटले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या मनातील अशांतता, मनोबल, आईशी असलेले नाते, निसर्ग आणि भौतिक सुख इत्यादींमध्ये बदल होतो. मान्यतेनुसार, चंद्रदेवाचा या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावर सखोल परिणाम होतो. चंद्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
चंद्राच्या सर्वांत आवडत्या राशींपैकी एक कर्क रास मानली जाते. त्यामुळे या संक्रमणाचा या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होताना दिसून येतो. चंद्राच्या हालचालींमध्ये होणारा बदल कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणणारा असतो. या सर्वांचा फायदा कर्क राशीच्या व्यवसायिकांना आर्थिक प्रगती करण्यात होतो. यामुळे या लोकांच्या घरातील वातावरण आनंदी राहते आणि यांचा मानसिक ताणदेखील कमी होतो. हे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात. तसेच यांचे आरोग्यही उत्तम राहते.
चंद्र देव मकर राशीत आहेत तर आता धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करत असल्याने या संक्रमणाचा मकर राशीच्या लोकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. धनिष्ठा नक्षत्राचे पहिले चौदा चरण देखील मकर राशीत येतात. चंद्राच्या या दुहेरी संक्रमणाचा मकर राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होतो. व्यवसायात यश मिळाल्याने तुम्हाला अपेक्षित फायदे होतील. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
धनिष्ठा नक्षत्रातील चार चरणांपैकी पहिले दोन चरण मकर राशीत येतात तर दुसरे दोन चरण कुंभ राशीत येतात. या दोन चरणांमुळे चंद्राच्या संक्रमणाचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे व्यवसायात वाढ करण्यासाठी या योजना यशस्वी होतात. कोणत्याही गुंतवणुकीत पैसे गुंतविले असल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. भावडांसोबत वेळ घालवू शकतात. जर एखादी व्यक्ती आजारी असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)