Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanu Sankranti 2025: 15 की 16 कधी आहे धनु संक्रांती, जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

या महिन्यात सूर्य धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्या दिवशी धनु संक्रांती साजरी केली जाणार आहे. संक्रांतीच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात अपेक्षित यश मिळतात. धनु संक्रांती कधी आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 08, 2025 | 10:02 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • धनु संक्रांती कधी आहे
  • धनु संक्रांती महत्त्व
  • धनु संक्रांती मुहूर्त
सनातन धर्मामध्ये सूर्याला प्रकाशाचा स्रोत मानले जाते. त्यांची पूजा एक शक्तिशाली देवता म्हणून केली जाते. त्यांना नऊ ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे राशी परिवर्तन हा एक विशेष मानले जाते. ज्यावेळी सूर्य राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी राशीच्या नावाने संक्रांतीचा सण साजरा केला जातो.

या महिन्यात भगवान सूर्य धनु राशीत प्रवेश करतील. त्या दिवशी धनु संक्रांती साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार  भगवान सूर्य धनु राशीत प्रवेश करतात तेव्हा खरमास सुरू होतो, ज्यादरम्यान शुभ कार्य करणे निषिद्ध असतात. या महिन्यात सूर्याची विशेष पूजा केली जाते. संक्रांतीच्या दिवशी त्यांची योग्य पूजा केल्याने जीवनात शुभ फळे मिळतात असे मानले जाते. धनु संक्रांती कधी साजरी जाणार आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे धनु संक्रांती

यावेळी सूर्य वृश्चिक राशीतून संक्रमण करणार आहे. मंगळवार, 16 डिसेंबर रोजी पहाटे 4.26 वाजता सूर्य वृश्चिक रास सोडून धनु राशीत प्रवेश करेल. यासोबतच खरमास सुरू होईल. सूर्य 14 जानेवारीपर्यंत धनु राशीत संक्रमण करेल. त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे.

Gemology: करिअर आणि संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी ‘ही’ रत्ने करा परिधान, मिळेल अपेक्षित यश

धनु संक्रांती शुभ मुहूर्त

धनु संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी 7.9 ते दुपारी 12.23 पर्यंत असणार आहे. यावेळी महापुण्य काळ सकाळी 7.9 ते 8.53 पर्यंत असेल. शुभ मुहूर्त पहाटे 4.27 वाजता असेल.

धनु संक्रांतीला पूजा करण्याची पद्धत

धनु संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठा. त्यानंतर, पवित्र नदीत स्नान करा ते शक्य नसल्यास घरी गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्नान करा. त्यानंतर, स्वच्छ कपडे परिधान करा आणि सूर्यदेवाची प्रार्थना करा. त्यानंतर एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये रोळी आणि फुले ठेवा नंतर ते सूर्यदेवाला अर्पण करा. अर्पण करतेवेळी ॐ सूर्याय नम: या मंत्रांचा जप करा. भगवान सूर्याला लाल फुले अर्पण करा. धूप आणि दिवा लावा. शेवटी, भगवान सूर्याची आरती करा.

Zodiac Sign: रवि पुष्य योग आणि महादेवांच्या आशीर्वादाने कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार फायदा

धनु संक्रांतीचे महत्त्व

धनु संक्रांती ही केवळ भगवान सूर्याच्या राशी बदलाचे प्रतीक नाही तर तिचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. पितृदोषाने ग्रस्त असलेल्यांनी या दिवशी त्यांच्या पूर्वजांची पूजा करावी. धनु संक्रांतीच्या दिवशी, योग्य विधींनी स्नान, दान आणि सूर्याची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. सूर्याचा शुभ प्रभाव तुमच्यावर पडतो आणि आजार बरे होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: धनु संक्रांती कधी आहे

    Ans: धनु संक्रांती मंगळवार, 16 डिसेंबर रोजी आहे. यावेळी सूर्य धनु राशीत प्रवेश करेल

  • Que: धनु संक्रांती म्हणजे काय

    Ans: सूर्य धनु राशीतून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करतो त्याला धनु संक्रांती म्हणतात. हिंदू धर्मामध्ये ही संक्रांती खूप पवित्र मानली जाते

  • Que: या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे

    Ans: तांदूळ, गहू, तूप, वस्त्रदान, दिवा व अन्नदान याचे दान करावे

Web Title: Dhanu sankranti 2025 dhanu sankranti shubh muhurt method and importance of worship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.