फोटो सौजन्य- istock
हिंदू धर्मात दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे. प्रकाशाचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धनत्रयशोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबर रोजी आहे. जाणून घेऊया लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा पद्धत
अमावस्या तिथी गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:11 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार 1 नोव्हेंबर संध्याकाळी 5:12 पर्यंत चालेल. अशा प्रकारे, हे केवळ अमावस्येच्या संपूर्ण रात्री म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी उपलब्ध आहे. याशिवाय रात्री १:०२ वाजता चित्रा नक्षत्र सुरू होईल आणि त्यानंतर स्वाती नक्षत्र.
प्रदोष काळातील खूप चांगला योगही गुरुवारी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी प्रदोष काल, निशीथ काल आणि महानिषित काल यांचा शुभ संयोग आहे. धार्मिक शास्त्रानुसार दिवाळीच्या पूजेमध्ये प्रदोष कालावधी खूप महत्त्वाचा आहे. प्रदोष काळ हा घरगुती आणि व्यावसायिक कामांसाठी महत्त्वाचा आहे. प्रदोष काल संध्याकाळी 5.23 ते रात्री 8 पर्यंत राहील.
हेदेखील वाचा- दिवाळीच्या दिवशी राशीनुसार करा ‘हे’ वास्तू उपाय, घरात लाभेल सुख-समृद्धी
लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती
गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती
नाणी किंवा नोटा
दागिने किंवा चांदीची नाणी
एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा.
चौरंग किंवा पाठ
लाल रंगाचे कापड
पाणी
तांदूळ
गंध
पंचामृत
हळद, कुंकू
हेदेखील वाचा- दिवाळीच्या दिवशी ‘हे’ विधी करणे मानले जाते शुभ
अक्षदा
फुले
विड्याची पाच पाने
झाडू
लाह्या बताशे
लक्ष्मीपूजनाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड अंथरून घ्यावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावे आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंग वर मध्यभागी तांदुळाची रास करावी. त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे नाणी ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते.
प्रत्येक सणामागे एक पौराणिक कथा आहे. लक्ष्मीपूजनाबाबत पण एक प्रसिद्ध कथा आहे. असं म्हणतात विष्णू देवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व देवांना माता लक्ष्मीसह बळीच्या कारागृहातून मुक्त केलं होतं. माता लक्ष्मी ही भगवान विष्णू यांची पत्नी, त्यामुळे आपण आजच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो आणि विजयाचा आनंद साजरा करतो.