फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या शास्त्रांचा उल्लेख केला गेला आहे त्यातील एक म्हणजे स्वप्नशास्त्र होय. झोपेमध्ये येणाऱ्या स्वप्नांचा विविध प्रकारे अर्थ सांगण्यात आलेला आहे. असे म्हटले जाते की, स्वप्नात पाऊस दिसणे म्हणजे ते शुभ असल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच ते आपल्या नशिबाशी देखील संबंधित असल्याचे शास्त्रात म्हटले जाते. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पाऊस पडताना दिसणे शुभ की अशुभ जाणून घ्या
स्वप्नामध्ये तुम्हाला पाऊस पडताना दिसणे हे एक शुभ लक्षण मानले जाते. स्वप्नसास्त्रानुसार, स्वप्नात पाऊस पडताना दिसत असल्यास तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार असल्याचे समजले जाते. तसेच तुमची कोणतीही कामे प्रलंबित असल्यास ती सर्व कामे पूर्ण होणार आहेत असा देखील या घटनेचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील असे म्हटले जाते.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत असल्यास ते शुभ लक्षण मानले जाते. या संकेताचा अर्थ असा होतो की, तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला धनप्राप्ती होण्याचे हे संकेत आहे. जर तुम्ही आर्थिक संकटामध्ये अलाल तर त्यातून तुमची लवकरच सुटका होणार आहे असे देखील म्हटले जाते. स्वप्नशास्त्रानुसार, तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता संभावते.
जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला पावसात भिजताना पाहण्याचा अर्थ तुम्हाला लवकरच नोकरी व्यवसायात यश मिळणार आहे. तसेच तुम्हाला जीवनात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत असल्यास त्यातून तुमची लवकरच सुटका होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते, असे देखील म्हटले जाते. त्याचसोबत नोकरीत येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात.
स्वप्नामध्ये सगळीकडे पाणी झाल्याचे दिसण्याचे लक्षण शुभ मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न दिसणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळणार असे म्हटले जाते. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभाची देखील शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर पाऊस पडताना पाहणे किंवा सर्वत्र पाणी झाल्याचे पाहणे म्हणजे जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. तसेच घरामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते. परिवारामध्ये जर कोणत्याही प्रकारचे मतभेद असतील तर ते दूर होतात आणि घरात सकारात्मकता राहते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)