फोटो सौजन्य- istock
चतुर्थी तिथी गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. अश्विन महिना सुरू झाला आहे. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच संकष्टी चतुर्थी ती पितृ पक्षात येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख, वेदना आणि आर्थिक संकट दूर होईल. म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला श्रीगणेशाची आणि तुमच्या पूर्वजांची कृपा प्राप्त होईल. जाणून घ्या संकष्टी चतुर्थी कधी आहे आणि पुजेची वेळ कोणती आहे.
संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9:15 वाजता सुरू होईल आणि 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:13 वाजता समाप्त होईल. 21 सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार असून या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त रात्री 8.29 वाजता आहे.
हेदेखील वाचा- घराचा हा कोपरा पिवळ्या रंगाच्या वस्तूंसाठी आहे शुभ, आर्थिक लाभ होण्याची शक्यता
संकष्टी चतुर्थी महत्त्व
आश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत व उपासना करणाऱ्या व्यक्तीची चंद्रोदयानंतर अर्घ्य व पूजा केल्यावरच पूजा पूर्ण होते. असे मानले जाते की, आश्विन संकष्टी चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक पूजा करून ब्राह्मणाला दान दिल्याने व्यक्तीचे सर्व संकट नष्ट होतात. ज्योतिषांच्या मते, आश्विन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबतच व्रत कथा जरूर वाचावी किंवा ऐकावी.
हेदेखील वाचा- पितृ पक्षातील तिथी अतिशय खास आहेत, या दिवशी श्राद्ध केल्याने आत्म्याला मिळेल शांती
संकष्टी चतुर्थीला शुभ योग
या संकष्टी चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे श्रीगणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फल प्राप्त होईल. पितृ पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हर्ष योग तयार होत आहे. याशिवाय शिववास योगही होणार आहे. या योगांमध्ये श्रीगणेशाची आराधना केल्याने साधकाचे सुख आणि सौभाग्य वाढते. तसेच सर्व दु:ख, संकटे, अडथळे दूर होतात.
संकष्टी चतुर्थी व्रताचे नियम
सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून पवित्र स्नान करावे. घरातील पूजेची खोली नीट स्वच्छ करावी. मंदिरासमोर चौरंग ठेवावे त्यावर लाल किंवा पिवळे कापड पसरवावे. त्यावर श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करा, धूप दिवा लावा आणि खालील मंत्राचा उच्चार करून पूजा सुरू करा.
सर्वप्रथम गणेशाच्या कपाळावर रोळी अक्षत तिलक लावा. दुर्वासोबत लाल किंवा पिवळी फुले अर्पण करा. भोग म्हणून मोदक, फळे इ. संकष्टी कथा वाचा किंवा ऐका. यानंतर श्रीगणेशाची आरती करावी. शुभ मुहूर्तानुसार संध्याकाळी गणेशाची ही पूजा करुन नैवेद्य दाखवावा.