फोटो सौजन्य- pinterest
यंदा रविवार, 3 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस मैत्रीच्या नावाने साजरा केला जातो. या दिवशी मित्र एकमेकांना भेटवस्तू देतात. मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे. बऱ्याच वेळा रक्ताचे नाते विश्वासघात करतात पण मित्र नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहतो. अशा वेळी तुमच्या मित्र मैत्रिणीला त्याच्या राशीनुसार या भेटवस्तू द्या. त्यामुळे तुमच्या जीवनात प्रगती होईल आणि आनंद येईल.
मेष राशीच्या लोकांना फ्रेंडशिप डेच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेट्स किंवा गेमिंग किट भेट म्हणून देऊ शकता. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते.
वृषभ राशीच्या लोकांनी फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणींना संगीत वाद्ये भेट म्हणून देऊ शकतात. तसेच तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचे देखील नियोजन करु शकता.
या राशीच्या लोकांना काहीतरी नवीन शोधण्यात किंवा काहीतरी सर्जनशील करण्यात अधिक रस असतो. त्यामुळे तुम्ही या लोकांना काहीतरी क्रिएटिव्ह भेटवस्तू देऊ शकता.
कर्क राशीचे लोक स्वभावाने खूप भावनिक असतात. त्यामुळे या लोकांना फ्रेंडशिप डेच्या दिवशी फोटो फ्रेम किंवा अल्बम भेट म्हणून देऊ शकतात.
सिंह राशीच्या लोकांचे छंद खूप मोठे असतात. त्यामुळे या लोकांना स्टायलिश कपडे, घड्याळे, गॅझेट या गोष्टी फ्रेंडशिप डेच्या दिवशी भेट म्हणून देऊ शकतात.
कन्या राशीचे लोक स्वभावाने खूप भावनिक असतात. फ्रेंडशिप डेच्या दिवशी या लोकांना डायरी, फोटो फ्रेम किंवा हाताने बनवलेले कार्ड भेट म्हणून द्या.
तूळ राशीच्या लोकांना तुम्ही संगीताशी संबंधित कोणत्याही गोष्टी भेट म्हणून देऊ शकतात. तसेच तुम्ही दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण करण्यासाठी बाहेर जाऊ शकता.
वृश्चिक राशीच्या लोकांना स्वतःसोबत जास्त वेळ घालवायला आवडते. या दिवशी तुम्ही त्यांना परफ्यूम भेट म्हणून देऊ शकता.
धनु राशीच्या लोकांचा स्वभावाने उत्सुक असतात. तसेच त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड असते त्यामुळे या लोकांना पुस्तके किंवा कलेशी संबंधित वस्तू भेट म्हणून देऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांना फ्रेंडशिप डे च्या दिवशी सॉफ्ट टॉय, ब्लँकेट किंवा मखमली वस्तू भेट म्हणून देऊ शकतात.
कुंभ राशीच्या लोकांना दुर्मिळ गोष्टी फार आवडतात. या लोकांना तुम्ही प्राचीन वस्तू भेट म्हणून देऊ शकता. त्यामुळे ते आनंदी होतील.
मीन राशीच्या लोकांचा स्वभाव धार्मिकतेशी जोडलेला असतो. त्यामुळे फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने तुम्ही त्यांना देवाची मूर्ती किंवा वास्तुशी संबंधित एखादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)