फोटो सौजन्य- istock
हिंदू परंपरेनुसार, देव आणि मंदिर याला भक्ती आणि आदराचे प्रतीक मानले जाते. बऱ्याचदा लोक मंदिरात जाऊन नवस करतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी केळी किंवा नारळ अर्पण केला जातो. मात्र, मंदिरात नारळ आणि केळी सर्वात जास्त का अर्पण केली जातात? इतर फळे बियाण्यांद्वारे पुनरुत्पादित होतात. जर बिया प्राणी, पक्षी किंवा मानवांनी खाल्ल्यानंतर पडल्या तर त्या बियाण्यापासून एक नवीन वनस्पती उगवते. म्हणून, फळांमध्ये भूतकाळातील जीवनाचे अवशेष, इतर जीवांचे अवशेष असू शकतात परंतु नारळ आणि केळी अशा प्रकारे पुनरुत्पादित होत नाहीत. ही अशी फळे आहेत ज्यात संपूर्ण ज्ञान आहे. म्हणूनच त्यांना पवित्र मानले जाते.
असे म्हटले जाते की, नारळ फोडल्याने आपला अहंकार नष्ट होतो. त्याच्यावरील कठीण आवरण आपल्या अहंकाराचे प्रतिनिधित्व करते आणि ते फोडून आपण स्वतःला समर्पण करतो. जर आपण सांस्कृतिकदृष्ट्या पाहिले गेल्यास याचा पूजेत वापर करणे म्हणजे स्वतःला समर्पण करण्याचे लक्षण मानले जाते. त्यामधील आतले पांढरे खोबर हे आपल्या मनाचे प्रतिबिंब असते.
नारळाला श्रीफळ असे देखील म्हटले जाते. धन, समृद्धी आणि संपत्तीची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नारळ अर्पण केले जाते. या फळाला तीन डोळे आहेत, जे त्रिनेत्र शिवाचे देखील प्रतीक मानले जाते. नारळाचे तीन डोळ्यामधील पहिले भूतकाळाचे प्रतिनिधित्व करतात, दुसरे वर्तमानाचे प्रतिनिधित्व करतात आणि तिसरे भविष्याचे प्रतिनिधित्व करतात. या तिन्ही डोळ्यांना शरीराचे प्रतीक मानले जाते. जे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर.
नारळाव्यतिरिक्त केळं हे अतिशय खास असे फळ आहे. जर आपण केळ खावून त्याची साल फेकून दिल्यास त्यापासून कोणतेही नवीन रोप उगवत नाही. केळीच्या झाडाच्या देठापासून नवीन कोंब उगवतील. केळीचे झाड आयुष्यात फक्त एकदाच फळ देते. पण शेवटी ते मरते आणि त्यातून नवीन कोंब उगवतात. हे जीवनातील त्याग आणि सद्गुणाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते.
पौराणिक कथेनुसार, विष्णू आणि लक्ष्मी यांना केळीच्या झाडाची पूजा करणे आणि केळीचे फळ अर्पण करणे विशेषतः आवडते. लक्ष्मीपूजेत केळीच्या पानांचा आणि फळांचा वापर अत्यंत शुभ मानला जातो. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये केळी अर्पण केली जातात. तसेच केळीच्या झाडाच्या पानाचा देखील वापर केला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)