
फोटो सौजन्य- pinterest
ज्यांना लग्नामध्ये सतत अडथळे येत आहेत किंवा योग्य जोडीदार सापडत नाही अशा लोकांनी काही रत्न परिधान करणे चांगले मानले जाते त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळते, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जर ग्रहांची स्थिती लग्नात अडथळे निर्माण करत असेल, तर योग्य रत्न धारण केल्याने नशिबाची अपेक्षित साथ मिळते. लग्नाची शक्यता निर्माण करत नाहीत तर जीवनात आनंद, शांती आणि आत्मविश्वास आणण्यासाठी कोणती रत्ने परिधान करावी, जाणून घ्या
पुष्कराज किंवा पिवळा नीलमणी हा गुरूचा रत्न मानला जातो. लग्नात विलंब होणाऱ्या मुलींना पुष्कराज घालण्याचा सल्ला दिला जातो. हे रत्न गुरु ग्रहाला बळकटी देण्याचे काम करते. तसेच नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करते आणि लग्नातील अडथळे हळूहळू दूर करते. पुष्कराज रत्न परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता येते आणि जीवनसाथीला सद्गुण प्राप्त होतात. गुरुवारच्या दिवशी पुष्कराज रत्न सोन्याच्या अंगठीमध्ये परिधान करणे शुभ मानले जाते.
नीलम रत्न हा शनि ग्रहाचा रत्न असल्याचे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनि बलवान नसतो त्यांच्यासाठी हे रत्न खूप शुभ आहे. नीलमणी धारण केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो, जीवनातील समस्या दूर होतात आणि व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो. नीलमणी हा एक अतिशय शक्तिशाली रत्न आहे. म्हणून, ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय तो परिधान करु नये. ज्यावेळी हे रत्न व्यक्तीला अनुकूल असते त्यावेळी तुमचे नशीब बदलू शकते.
माणिक हे सूर्याचे रत्न आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत असतो त्यांना अनेकदा आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो. माणिक घालल्याने आत्मविश्वास वाढतो, चेहऱ्यावर तेज येते आणि समाजात आदर येतो. जर लग्नाची शक्यता कमकुवत असल्यास माणिक रत्न परिधान केल्याने नातेसंबंध मजबूत होण्यास मदत होते. तसेच या रत्नामुळे सकारात्मक ऊर्जा देखील मिळते.
चंद्राचा रत्न असलेला मोती हा भावनिक संतुलनाचे प्रतीक मानला जातो. जर वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल किंवा मन अस्वस्थ असेल तर मोती घालणे अत्यंत फायदेशीर आहे. मोती परिधान केल्याने मन शांत होते, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढतो आणि वैवाहिक जीवनात शांती येते. हे रत्न परिधान करणे चांगले मानले जाते.
गोमेद किंवा हेसोनाइट हे राहूचे रत्न मानले जाते. जर राहू तुमच्या कुंडलीत समस्या निर्माण करत असल्यास किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे येत असल्यास गोमेद रत्न परिधान करणे खूप शुभ मानले जाते. हे रत्न नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि आत्मविश्वास वाढवते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)