Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2026: पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी जोडलेली कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसोबत काही उपाय केले जातात. त्याबरोबरच व्रत कथा देखील वाचावी, असे सांगितले जाते. पारधी आणि हरणाशी संबंधित महाशिवरात्रीशी एक कथा प्रचलित आहे ती जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 16, 2026 | 12:04 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • महाशिवरात्र कधी आहे
  • पारधी आणि हरणाची कथा
  • कथेचे महत्त्व
 

महाशिवरात्र ही भगवान शिवांना समर्पित पवित्र सण आहे. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात सर्वजण रविवार, 15 फेब्रुवारी रोजी साजरा करणार आहेत. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि रात्रभर जागरण करतात. उपवासासोबतच काही उपाय देखील केले जातात. मात्र महाशिवरात्रीच्या काही कथा देखील प्रसिद्ध आहेत त्या तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घेऊया महाशिवरात्रीशी संबंधित असलेली कथा

काय आहे पारधी आणि हरणाची महाशिवरात्रीशी संबिधित कथा

पौराणिक कथेनुसार, एकदा एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला पण त्याला काही शिकार मिळेना संध्याकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात तेथील एक हरीण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबियांना एकदा भेटून येऊ दे आणि माझी कर्तव्य मला पार पाडून येऊ देत.

Mahashivratri: महाशिवरात्र का साजरी केली जाते? पुराणामध्ये आहे भगवान शंकराची ही खास कथा

हरणाने वचन दिल्यामुळे पारध्याने त्याची विनंती मान्य केली त्याचवेळी दूरवरून मंदिरातील घंटाचे आवाज देखील येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होतं. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून एकेक पान तो खाली टाकत होता पण त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडाचे त्यालाच काही माहिती नव्हते. शिवपिंडावरती बेलाची एकेक पान पडत होती नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिवउपासना घडत होती हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले आता तू मला मार मी माझे कुटुंबप्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

तेव्हा लगेचच हरणाची पत्नी पुढे आली तिने म्हटले त्यांना नको मला मार. मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिल्लं देखील पुढे आली आणि म्हटली आईला नको आम्हाला मार. आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू देत हे पाहता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्रा असून देखील आपाल्या कर्तव्याला चुकले नाही आहेत तर मी मानव धर्म आणि द्याधर्म का सोडू? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावरती आणि पारध्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना आशीर्वाद दिले. सर्वांचा उद्धार केला हरणाला मृगनक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याग्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्यावेळी घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाशिवरात्रीच्या दिवशी पारधी आणि हरणाची कथा का सांगितली जाते?

    Ans: ही कथा भक्ती, करुणा आणि अनवधानाने केलेल्या पूजेचे महत्त्व सांगते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवकृपेचा संदेश देण्यासाठी ही कथा प्रचलित आहे.

  • Que: कथेनुसार पारधीने काय केले होते?

    Ans: एक पारधी शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. रात्री तो झाडावर बसून राहिला आणि खाली असलेल्या शिवलिंगावर नकळत बिल्वपत्र आणि पाणी टाकले.

  • Que: महाशिवरात्रीला ही कथा ऐकणे किंवा वाचणे का शुभ मानले जाते?

    Ans: श्रद्धेनुसार या दिवशी ही कथा ऐकल्यास शिवकृपा प्राप्त होते आणि मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

Web Title: Mahashivratri 2026 the story of pardhi and the deer related to mahashivaratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • mahashivaratri

संबंधित बातम्या

Numberlogy: हनुमान जयंतीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: हनुमान जयंतीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान
2

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha  यांचे विधान
3

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान

Sankashti Chaturthi 2026: एप्रिल महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ
4

Sankashti Chaturthi 2026: एप्रिल महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.