फोटो सौजन्य- pinterest
सप्टेंबरचा महिना खूप खास असणार आहे. या महिन्यामध्ये अनेक मोठे ग्रह आपले संक्रमण करणार आहे. या काळामध्ये अनेक मोठे ग्रह 5 दिवसांत आपली हालचाल बदलणार आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो. त्याचा प्रभाव विविध राशींच्या लोकांवर होताना दिसून येतो. ग्रहांच्या संक्रमणाला राशी परिवर्तन असे देखील म्हटले जाते. सप्टेंबर महिन्यात पुढील 5 दिवस कोणते ग्रह आपली हालचाल बदलणार आहेत ते जाणून घेऊया.
शनिवार, 13 सप्टेंबर रोजी मंगळ ग्रह आपली चाल बदलणार आहे. यावेळी तो आपली रास बदलून तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हा ग्रह 13 सप्टेंबर रोजी रात्री 9.34 वाजता आपली राशी बदलणार आहे. यावेळी तो तूळ राशीमध्ये 27 ऑक्टोबरपर्यंत राहील त्यानंतर तो वृश्चिक राशीमध्ये आपले संक्रमण करेल.
15 सप्टेंबरचा दिवस खूप खास असणार आहे. कारण या दिवशी दोन मोठे ग्रह संक्रमण करणार आहे. या ग्रहाला वाणी, बुद्धी आणि व्यवसायाचा कारक मानले जाते. बुध ग्रह हा कन्या राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. हे संक्रमण सोमवार, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11.10 वाजता होणार आहे.
त्यासोबतच 15 सप्टेंबर रोजी दुसरा ग्रह देखील आपली चाल बदलणार आहे. याला सुख आणि विलासाचे प्रतीक असलेला शुक्र ग्रह मानले जाते. 15 सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. या दिवशी दुपारी 12.23 वाजता शुक्र ग्रह सिंह राशीत आपले संक्रमण करेल.
बुधवार, 17 सप्टेंबर रोजी ग्रहांचा देव सूर्य देव आपल्या राशीमध्ये हालचाल करणार आहे. सूर्याचे संक्रमण सूर्य संक्रांती म्हणूनही ओळखले जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये सूर्याचे होणारे संक्रमण कन्या राशीमध्ये होणार आहे. या दिवशी सूर्य दुपारी 1.54 वाजता आपली राशी बदलणार आहे.
या काळात वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामामध्ये आणि व्यवसायात प्रगती होईल. तसेच व्यवसायात वाढ होण्यास मदत होईल.
सिंह राशीच्या लोकांची अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि त्यांना मानसिक शांती मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.
धनु राशीच्या लोकांना या संक्रमणाचा अधिक फायदा होईल आणि या काळात त्यांना त्यांच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)