फोटो सौजन्य- pinterest
हस्तरेषाशास्त्रानुसार, लोकांच्या तळहातावरील रेषेवरुन त्यांचे भाग्य वाचले जाते. तुमच्या हातावरील रेषेवरुन समजते की तुमच्या भाग्यामध्ये वाढ होणार आहे की नाही. आपल्या हातावर 3 मुख्य रेषा असतात. त्या म्हणजे हृदयरेषा, जीवनरेषा आणि मेंदूरेषा. या 3 रेषेव्यतिरिक्त इतर काही रेषा आहेत ज्या व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामधील एक असते ती भाग्यरेषा. या रेषेमुळे व्यक्तीचे जीवन कसे असेल ते समजते. त्या व्यक्तीचे भाग्य कसे वाढेल, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या रेषेवरुन समजतात. कोणती आहे ती रेषा, जाणून घ्या
हस्तरेषाशास्त्रानुसार, भाग्यरेषा ही हाताच्या मनगटातून किंवा जीवनरेषेतून बाहेर पडते. ही रेषा मेंदू रेषेपर्यंत किंवा हृदयरेषेपर्यंत जाते, तर काही तळहातांमध्ये भाग्यरेषा शनि पर्वत किंवा गुरु पर्वतापर्यंत जाते. काही लोकांच्या हातावरील रेषा चंद्र पर्वतापासून सुरू होते आणि शनि पर्वतापासून गुरु पर्वतापर्यंत जाते. या रेषेमुळे तुम्हाला जीवनात अनेक फायदे होतात. व्यवसायात देखील अपेक्षित यश मिळते.
ज्यावेळी हाताच्या चंद्र पर्वतातून एक रेषा निघते आणि थेट शनि पर्वतावर जाते त्यावेळी या लोकांचे भाग्य स्त्रीमुळे उगवते. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रला स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. ज्या लोकांच्या हातावर ही रेषा असते त्यांच्या आई, पत्नी, मुलगी किंवा महिला बॉसमुळे त्यांचे भाग्य वाढू शकते. या रेषेचा संबंध व्यक्तीला त्याच्या आईच्या मालमत्तेचा वारस बनवू शकते. तसेच या रेषेमुळे लग्नानंतर व्यक्तीच्या भाग्यामध्ये वाढ होऊ शकते. त्यासोबतच पत्नीकडून सुख, संपत्ती इत्यादी मिळू शकते.
तुमच्या उजव्या हाताकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. मनगटाच्या खालच्या डाव्या बाजूला असलेल्या भागाला चंद्र पर्वत म्हणतात. ज्यावेळी या ठिकाणाहून भाग्य रेषा जाते त्यावेळी वेगळी रेषा निघून मधल्या बोटापर्यंत पोहोचते आणि ती इतर कोणत्याही रेषेने कापली जात नाही. अशा वेळी लोकांचे भाग्य एका महिलेमुळे घडते.
हातातील शुक्र पर्वत हा भौतिक सुख आणि आरामासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. तुमच्या हातावरील मनगटाच्या उजव्या बाजूला आणि अंगठ्याच्या खाली असलेल्या भागाला शुक्र पर्वत म्हणतात. ज्यावेळी शुक्र पर्वतावरुन एक रेषा निघते आणि थेट शनि क्षेत्रात जाते अशा लोकांना सासरच्या बाजूने म्हणजेच पत्नीच्या बाजूनेही संपत्ती आणि मालमत्ता मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)