फोटो सौजन्य- pinterest
नऊ ग्रहांपैकी देवगुरु बृहस्पति हा सर्वांत शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहाला ज्ञान, धर्म आणि तत्वज्ञानाचा कारक मानले जाते. जर तुमच्या कुंडलीमधील गुरु बलवान असल्यास कुटुंब, समाज, करिअर, आरोग्य लाभ, मजबूत आर्थिक स्थिती, विवाह इत्यादींसारख्या गोष्टींमध्ये शुभ लाभ होतो.
गुरुवार, 12 जून रोजी देवगुरु बृहस्पति हा ग्रह मिथुन राशीतून अस्त होणार आहे. त्यानंतर पुढील 27 दिवस अस्ताच्या अवस्थेत राहिल्यानंतर 5 जुलै रोजी अस्ताचा उद्य होईल. मिथुन राशीतील गुरुचा अस्त काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. गुरुच्या या अस्तामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
देवगुरु बृहस्पति मेष राशीमध्ये तिसर्या घरामध्ये आहे. यामुळे तुम्हाला व्यावसायिक जीवनामध्ये याचा फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. तसेच तुमच्या उत्पन्नात वाढ देखील होईल. स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांना यश मिळेल.
देवगुरु बृहस्पति वृषभ राशीमध्ये आठव्या आणि अकराव्या घरामध्ये आहे. जर कोणत्याही व्यक्तीला जुने आजार असतील तर ते बरे होतील. तुम्हाला व्यवसायात वाढ करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता.
देवगुरु बृहस्पति मिथुन राशीमध्ये सातव्या आणि दहाव्या घरामध्ये आहे. यामुळे तुमचे जोडीदारासोबत असलेले मतभेद आज संपतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकतो. शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करत असाल तर काळजी घ्या अथवा नुकसानाला सामोरे जावे लागेल.
देवगुरु बृहस्पति कर्क राशीमध्ये सहाव्या आणि नवव्या घरात आहे. या लोकांना तब्ब्येतीची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये तुमचे विरोधक किंवा शत्रूंमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बॅंकेकडून कर्ज घ्यावे लागू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ असेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी देवगुरु बृहस्पति पाचव्या आणि आठव्या घरात आहे. आज तुम्ही व्यवसायाला गती मिळण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल त्यात तुम्हाला यश मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. विद्यार्थ्यासाठी हा दिवस सकारात्मक परिणाम देणारा असेल.
देवगुरु बृहस्पति असलेल्या कन्या राशीच्या लोकांसाठी चौथ्या आणि सातव्या घरात असेल. तुमचे कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. तसेच कन्या राशीचे लोक धार्मिक कार्यक्रमात रस घेतील. व्यावसायिकांना आर्थिक फायदे होतील.
तूळ राशीच्या लोकांसाठी देवगुरु बृहस्पति सहाव्या घरात असल्याने तुमचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. तूळ राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिक कार्याची आवड निर्माण होईल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देवगुरु बृहस्पति आठव्या घरात आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून मदत मिळेल. जर कोणी एखाद्या जुन्या आजाराने ग्रस्त असाल तर त्यातून तुम्हाला आराम मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी देवगुरु बृहस्पति चौथ्या घरात आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वाद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही गोष्टीमुळे मानसिक ताण येऊ शकतो.
देवगुरु बृहस्पति मकर राशीमध्ये तिसऱ्या आणि बाराव्या घरात आहे. कामाच्या ठिकाणी कामानिमित्त तुम्हाला दुसऱ्या शहरात जावे लागू शकते. तुम्हालो पोटांशी संबंधित आजार होऊ शकतात.
देवगुरु बृहस्पति कुंभ राशीमध्ये दुसऱ्या आणि अकराव्या घरात आहे. बऱ्याच काळापासून आजारी असल्यास आरोग्यात सुधारणा होईल. तुम्हाला नशिबाची साथ लाभेल.
देवगुरु बृहस्पति मीन राशीमध्ये दहाव्या घरात आहे. व्यवसायात पैसे गुंतवताना काळजी घ्यावी लागेल अन्यथा काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)