फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, आज 8 ऑक्टोबर रोजी सर्वात प्रभावशाली ग्रह, शुक्र आणि गुरु एकमेकांपासून 60 अंशांच्या कोनात स्थित आहे. या शुभ योगाला लाभ योग असे म्हटले जाते. ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सौभाग्य, प्रगती आणि सकारात्मक बदलाचे लक्षण मानले जाते. शुक्र हा प्रेम, विलासिता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, तर गुरू हा ज्ञान, संपत्ती आणि विस्ताराचे प्रतीक आहे. या दोन्ही ग्रहांचा काही राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होताना दिसून येतो.
हा योग काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. या काळामध्ये या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात फक्त फायदाच होणार नाही तर नातेसंबंधात गोडवा आणि स्थिरता देखील अनुभवता येईल. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ आणि फायदेशीर राहणार आहे. शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमची व्यावसायिक प्रतिमा आणि विश्वास वाढेल, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील. या काळात घरामध्ये शांतीचे वातावरण राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदान ठरणार आहे. गुरु ग्रहाची दृष्टी स्वाभाविकपणे शुभ आहे. या काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम होताना जाणवतील. या काळामध्ये तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील दीर्घकाळापासून असलेले तणाव किंवा मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ खुप फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला रखडलेल्या कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. उच्च पदांवर असलेल्यांना नेतृत्वाच्या संधी मिळू शकतात. परदेश प्रवास किंवा परदेश व्यापाराच्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. जुने वाद मिटू शकतील. या काळात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांचे मान सन्मान वाढेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)