फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये हरतालिका व्रताला खूप महत्त्व आहे. या दिवशी विवाहित महिला उपवास करून आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसेच कुमारिका देखील हा उपवास करतात. पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे व्रत पाळले जाते. यावेळी हरतालिकेचे व्रत मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची विधीवत पूजा केली जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची उपासना केली जाते. तुमचे नाते प्रेम, विश्वास आणि वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी हरतालिकेच्या दिवशी तुम्ही राशीनुसार हे उपाय केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. हरतालिकेला राशीनुसार कोणते उपाय करावे, जाणून घ्या
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीची सुरुवात 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12.34 वाजता सुरु होणार आणि या तिथीची समाप्ती मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1.54 वाजता होईल. त्यामुळे पंचांगानुसार हरतालिकेचे व्रत मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.
मेष राशीच्या लोकांनी हरतालिका व्रताच्या दिवशी महादेवांची विधिवत पूजा करुन गंगाजलाने अभिषेक करावा.
वृषभ राशीच्या लोकांनी हरतालिका व्रताच्या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी हरतालिका व्रताच्या दिवशी गरजूंना हिरव्या रंगाच्या बांगड्याचे दान करावे.
कर्क राशीच्या लोकांनी हरतालिका व्रताच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे फायदेशीर ठरेल.
हरतालिकेच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी महादेवाची विधीवत पूजा करावी.
कन्या राशीच्या लोकांनी हरतालिकेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना आपल्या क्षमतेनुसार पैशांचे दान करावे.
तूळ राशीच्या लोकांनी हरतालिकेच्या दिवशी पंचामृताने शंकराच्या शिवलिंगाचा जलाभिषेक करावा.
वृश्चिक राशीच्या लोकांनी हरतालिकेच्या दिवशी महादेवाच्या पूजेसोबत प्राणी आणि पक्ष्यांना खाऊ घालावे.
हरतालिकेच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी महादेवांची विधिवत पूजा करुन गरिबांमध्ये वस्तूंचे दान करावे.
मकर राशीच्या लोकांनी हरतालिकेच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे.
कुंभ राशीच्या लोकांनी हरतालिकेच्या दिवशी गरजूंना हिरव्या वस्तूंचे दान करावे.
मीन राशीच्या लोकांनी हरतालिकाचा उपवास करुन हरतालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)