
फोटो सौजन्य - Social Media
8 गंधर्वांना मिळालेल्या श्रापामुळे स्वर्गातील ऐशोआराम सोडून पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. त्यातील 7 जणांना जन्म घेताच मृत्यू काबीज केला आणि या श्रापासून मुक्त झाले. पण 8 वा वसु पृथ्वीवरच राहिला तो म्हणजे भीष्म! पितामह भीष्म पांडव तसेच कौरवांचे आजोबा. खरं तर नात्याने चुलत आजोबा. भीष्मांना दोन्ही मुले सारखीच होती. पांडव असो वा कौरव, दोघे अगदी कुरुवंशांचेच रक्त होते. अशात कुरुक्षेत्राच्या लढाईत भीष्मांना पांडवांच्या समोर उभे रहावे लागले. पण भीष्मांनी ठरवलेच होते की त्यांच्या हातून ना युधिष्ठिर मारला जाईल, ना अर्जुन, ना भीम, ना नकुल आणि ना सहदेव!
अर्जुनाला ही युद्धाच्या दरम्यान भीष्मांवर वार करणे जड जात होते. तेव्हा श्री कृष्ण आपले वचन मोडण्यास निघाला होता, तेव्हा अर्जुनाने समोर कोण आहे? याचा विचार सोडून, युद्ध करणेच त्याचा धर्म आहे याचा स्वीकार केला. श्री कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली. पण भीष्माला इच्छामरण होते. कितीही बाण येऊन लागले तरी भीष्म काही मरणार नाही, हे स्वतः श्री कृष्णालाही ठाऊक होते. युद्धदरम्यान रात्रीच्या मंद छायेत, पांडवासहीत श्री कृष्ण भीष्मांच्या शिबिरात जातात. भीष्मांना कसे मारावे? याचा उत्तर खुद्द भीष्मांकडून घेतात.
भीष्म युद्ध नियमांचे काटेकोरपणे पाळण करणारे. युद्धात महारथी महारथीशीच लढतो. पण पांडवांकडे भीष्मांसारखा महारथी नव्हता त्यामुळे हे युद्ध एकतर्फी होते. एकटे भीष्म पूर्ण पांडव सैन्याला पुरून उरत होते. त्यामुळे भीष्मांनी स्वतः पांडवांना त्यांना मारण्याची पद्धत सांगितली. त्यांनी सांगितले की एक असा व्यक्ती जो स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही, तोच माझा वध करू शकेल.
मागच्या जन्मात स्त्री असणारा पांडव सेनेतील योद्धा शिखंडीला अर्जुनाने त्याच्या रथाचा सारथी केला. कारण भीष्म अशा व्यक्तीवर हल्ला न करता तेथेच शस्त्र सोडून देतील ज्याचा फायदा पांडव सैन्याने घेतला आणि शेकडो बाण भीष्मांवर सोडले आणि भीष्म जमिनीवर कोसळले. पण ते जमिनीवर टेकले नाही कारण ते बाणशय्येवर होते. सूर्याच्या दक्षिणायनात भीष्मांनी प्राण सोडले आणि महाभारतातील भीष्मपर्व संपला.