Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? काय आहे इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

भारताचा स्वातंत्र्य दिन हा आपल्या इतिहासातील सर्वात खास दिवसांपैकी एक आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून 15 ऑगस्टचा दिवस साजरा करण्यात येतो. स्वातंत्र्य दिवसामागील इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 13, 2025 | 02:59 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या इतिहासातील सर्वात खास दिवस म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन. जवळजवळ 200 वर्षे ब्रिटिशांच्या राजवटीत राहिल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत अखेर स्वतंत्र झाला. हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. या वेळी देशभर ध्वजारोहण, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच आपल्या मनात देशभक्ती आणि एकतेची भावना देखील बळकट होते.

यापूर्वी ब्रिटीश सरकारने 30 जून 1948 हा दिवस भारत स्वतंत्र करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, 1947 मध्ये देशाच्या फाळणी, राजकीय संघर्ष आणि जातीय हिंसाचाराच्या धोक्यामुळे तणाव वेगाने वाढत होता. जाणून घ्या स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो आणि त्यामागील इतिहास, महत्त्व

स्वातंत्र्य दिनाचा इतिहास काय आहे

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यापूर्वी भारत सुमारे 200 वर्षे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. या स्वातंत्र्यामागे अनेक दशकांचा संघर्ष, चळवळ आणि त्याग लपलेला आहे. त्यानंतर 1857 च्या क्रांतीपासून ते महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळ, मीठ सत्याग्रह आणि भारत छोडो चळवळीपर्यंत, प्रत्येक पावलाने स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला.

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते

स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व

स्वातंत्र्य दिन आणखी खास मानला जातो. कारण हा दिवस केवळ इतिहासाची आठवण करुन देत नाही तर भविष्यासाठी देशाला मजबूत करण्यासाठी देखील प्रेरणा देतो. या प्रसंगामुळे आपल्याला एकता, बंधुता आणि विकासाच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा देतो.

Independence Day 2025 : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी घरी बनवा गोडसर तिरंगा बर्फी; खाता क्षणीच मनात उमटेल गोड लहर

स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची पद्धत

पारतंत्र्याचे चटके सहन केलेल्या भारतीयांना जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय होता. त्यामुळे या पिढीला स्वतंत्र्याची दाहकता, त्याचे महत्त्व त्याची गरज माहिती होती त्यामुळे हे सर्वच स्वतंत्र प्राप्तीचा आनंद अगदी सण उत्सवाप्रमाणे साजरे करीत असतं आणि आजही हा आनंद कमी झाला असे नाही. पण त्यातील दाहकता कमी होत चालली आहे. झेंडावंदन नंतर देशभक्तीपर गीते गायली जायची. काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे. गावागावात, शहराशहरात वंदे मातरम्, भारत माता की जय असा उद्घोष होत, प्रभातफेरी काढली जात. फक्त शाळेतील मुलंचं नाही तर घरातील प्रत्येक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असे अशा विविध पद्धतीने गाव शहरांमध्ये स्वातंत्र्य दीन उत्साहात साजरा केला जातो.

देशाच्या विविध भागात पूर्वी काळी स्वतंत्र दीन साजरा करण्याच्या विविध पद्धती असतील तरीसुद्धा झेंडावंदन, प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबविले जात ही कॉमन पद्धत होती. कोल्हापूर, सांगलीमध्ये या दिवशी जिलेबी खाण्याची पद्धत आहे, तर मुंबईमध्ये या दिवशी सोसायटी, चाळींमध्ये सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केले जाते. सकाळी सोसायटी झेंडावंदन, दुपारी पूजा व रात्री देशभक्तीपर गीताचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजन केले जाते. गावपातळीवर या दिवशी मैदानी खेळांचे सामने भरविले जातात.

Web Title: Independence day 2025 why is independence day celebrated history importance method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 02:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.