फोटो सौजन्य- pinterest
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीच्या दिवशी इंदिरा एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. यंदा ही एकादशी बुधवार, 17 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी भक्तांनी उपवास करणे आणि विष्णूची पूजा करणे याला महत्त्व असते. एकादशीच्या दिवशी विष्णूंसोबत पितरांची देखील पूजा केली जाते.
या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. याशिवाय इंदिरा एकादशीला बरेच लोक दानधर्म देखील करतात. इंदिरा एकादशीला तुमच्या राशीनुसार काही उपाय केले तर पितृदोष, ग्रहदोष आणि जीवनाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तुमच्या राशीनुसार इंदिरा एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी आवरुन झाल्यानंतर तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा. यामुळे घरामधील कलह दूर होण्यास मदत होते.
वृषभ राशीच्या लोकांनी इंदिरा एकादशीच्या दिवशी गरीब किंवा गरजूंना पांढरे कपडे आणि पांढरी मिठाई यांचे दान करावे. असे केल्याने घरामध्ये शांती आणि समृद्धी राहील.
मिथुन राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा करावी. पूजेदरम्यान देवाला तुळशीची पाने आणि पिवळी फुले अर्पण करावी. असे केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.
कर्क राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पूजेवेळी भगवान विष्णूंना गंगाजलाचा अभिषेक करावा आणि पितरांना तर्पण अर्पण करावे. असे केल्याने पितृदोष नाहीसा होतो.
सिंह राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करुन भगवान विष्णूंची पूजा करावी. त्यानंतर सहस्त्रनामाचे पठण करावे. यामुळे तुमच्यामधील आदर आणि आत्मविश्वास वाढेल.
कन्या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी गाईला गूळ आणि हिरवे गवत खायला द्यावे. असे केल्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि प्रेम वाढेल.
तूळ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पक्ष्यांना धान्य आणि पाणी द्या. यामुळे मुलांच्या जीवनात आनंद येईल आणि शिक्षणात प्रगती होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी काळे तीळ आणि उडीद डाळ याचे दान करावे. असे करणे म्हणजे आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि अडचणींपासून सुटका होते.
धनु राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करुन पिवळी फळे आणि पिवळी मिठाईचे दान करावे. यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमची प्रलंबित कामे देखील पूर्ण होतील.
मकर राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी गरिबांना तेल किंवा ब्लँकेट दान करा. कामाच्या ठिकाणी स्थिरता येईल आणि घरात सुख-शांती राहील.
कुंभ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी मंदिरात पाण्याचा भांडे किंवा शुद्ध पाणी ठेवा. यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि प्रगती वाढेल.
मीन राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी विष्णूच्या मंदिरात जाऊन भजन-कीर्तन करावे आणि त्यांच्यासमोर दिवा लावावा. त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)