शनी वक्रीचा कोणत्या राशींवर होणार परिणाम (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
शनी हा असा ग्रह आहे की नाव घेतल्यानंतरही समोरच्या व्यक्तीला घाम फुटतो दंड देणारा शनि लवकरच आपली हालचाल बदलून वक्री होणार आहे. शनीची वक्री चाल लोकांचे जीवन उलथापालथ करते. जुलैपासून वक्री होणारा शनी ५ राशीच्या लोकांना मोठा त्रास देऊ शकतो. शनी हा असा ग्रह आहे जो भल्याभल्यांची तारांबळ उडवू शकतो. राजाला रंक आणि रंकाचा राजा करू शकतो.
पण शनी वक्री झाल्याने यावेळी नक्की कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे याबाबत ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. शनी हा अनेकदा वाईट ग्रह मानला जातो. पण तसे अजिबात नाही, शनी ग्रहाच्या वक्री होण्याने मात्र काही वाईट गोष्टी घडू शकतात. होत्याचे नव्हते होऊ शकते, पण म्हणजे नक्की काय आणि कशा पद्धतीने याचा परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Google Gemini AI)
राशींवर शनीचा प्रभाव
काही राशींवर शनी वक्रीचा प्रभाव राहणार आहे. २०२५ मध्ये, न्यायदेवता शनी प्रथम गोचर झाला आणि आता तो वक्री होणार आहे. १३ जुलैपासून शनी वक्री होणार आहे. शनीची वक्री चाल ही विशेषतः साडेसती असणाऱ्या व्यक्तींना किंवा धैय्यातून जाणाऱ्या राशींना मोठ्या त्रास देऊ शकते.
१३ जुलै ते २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच १३८ दिवसांसाठी शनि वक्री होईल. हा काळ सोपा नसेल कारण वक्री शनीचा जास्त त्रास होतो. तथापि, कुंडलीतील शनीच्या स्थितीनुसार लाभदेखील होतो. कोणत्या राशींसाठी शनीची वक्री हालचाल अशुभ असेल ते जाणून घेऊया.
मेष राशीवरील परिणाम
मेष राशीवर शनीची साडेसती सुरू आहे. अशा परिस्थितीत, वक्री शनीमुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. खर्च तुमच्या नियंत्रणात राहणार नाही. म्हणून अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. तणाव आणि वाद तुम्हाला त्रास देतील. कोणाचाही अपमान करण्याची चूक करू नका. स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवा आणि काळजी घ्या
मिथुन राशीला त्रास
शनीच्या वक्री गतीमुळे मिथुन राशीच्या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला बरेचदा तणाव जाणवेल. कामातील अडथळ्यांमुळे तुम्हाला त्रास होईल. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील. धीर धरा आणि मोठे निर्णय घेण्यापासून दूर राहा. तसंच निर्णय घेण्यापूर्वी विचार करा आणि मगच योग्य पाऊल उचला जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही
कन्या राशीसाठी आव्हानात्मक
कन्या राशीच्या लोकांसाठीही हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. मन अस्वस्थ आणि दुःखी असेल. घर असो वा ऑफिस, तुम्हाला गोंधळलेले वाटेल. वाद टाळणे चांगले. संभाषणाद्वारे समस्या सोडवा. कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या अवतीभोवती नक्की काय चालू आहे याकडे काटेकोरपणे लक्ष द्या
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी रहावे सतर्क
वृश्चिक राशीच्या लोकांना शनी ग्रहाच्या वक्री होण्यामुळे संघर्षाचा काळ येऊ शकतो. त्यांना अधिक मेहनत करावी लागेल. थकवा आणि ताण येऊ शकतो. संभाषण शांततेत होईल याची खात्री करा. तुमचे काम एकाग्रतेने करा, अन्यथा तुम्ही चूक करू शकता. तसंच शक्य होईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि विवादापासून दूर रहा.
धनु राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी
धनु राशीच्या लोकांनी हा काळ काळजीपूर्वक घालवावा. तुम्ही शनीच्या धैय्याच्या प्रभावाखाली आहात. भावनिक आणि मानसिक पातळी अस्थिर राहील. म्हणून घाईघाईने किंवा रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. नातेसंबंध बिघडू शकतात. हे ३ महिने शांततेत घालवा.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.