फोटो सौजन्य- pinterest
यंदा ज्येष्ठ अमावस्या बुधवार, 25 जून रोजी साजरी केली जाणार आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. मान्यतेनुसार, अमावस्येच्या दिवशी तर्पण, श्राद्ध, पिंडदान इत्यादी केल्याने पुण्य लाभते असे मानले जाते. पित्तरांना प्रसन्न करणे आणि पितृदोषापासून सुटका करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात त्यामधील एक म्हणजे पंचबली कर्म. यामध्ये प्राणी पक्ष्यांना अन्न दिले जाते. तसेच या दिवशी लोक कावळ्याची वाट पाहत असतात. अमावस्येच्या दिवशी घरात कावळा येणे शुभ की अशुभ? काय आहे पूर्वजांशी संबंध, जाणून घ्या
इतर दिवशी घरात कावळा येणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की, इतर दिवशी कावळा घरात येणे म्हणजे वाईट बातमी ऐकायला मिळणे. कावळ्याचा आवाज कर्कश असतो, त्यामुळे लोक त्याला हाकलून लावतात. पूर्वीच्या काळी घराबाहेर कावळा आला म्हणजे कोणीतरी पाहुणा येणार असे मानले जायचे.
अमावस्या किंवा पितृपक्षामध्ये कावळा घरात येणे शुभ किंवा अशुभ मानले जात नाही. तर कावळ्यामध्ये पूर्वज येतात, असे मानले जाते. मान्यतेनुसार, कावळा हा नश्वर जगाला म्हणजेच पृथ्वी आणि यमलोकाला जोडणारा माध्यम आहे.
अमावस्येच्या दिवशी कावळ्यांचे घरात येणे शुभ मानले जाते. या दिवशी कावळ्यांना घरात केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. ते अन्न कावळ्यांनी ग्रहण केले म्हणजे ते पूर्वजांपर्यंत पोहोचते, अशी मान्यता आहे. गुरुड पुराणामध्ये उल्लेख केल्यानुसार, गाय, कावळा, कुत्रा यांना जेव्हा आपण अन्न खायला देतो तेव्हा ते अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते, असे म्हटले जाते. यामुळे पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे.
सकाळी घरात कावळा येणे शुभ मानले जाते. तफोटो सौजन्य- pinterestसेच कावळ्याने येऊन आवाज करणे म्हणजे तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे किंवा घरात कोणीतरी पाहुणा येणार आहे असे मानले जाते.
जर तुमच्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये कावळा येऊन बसण्याचा अर्थ असा होतो की, तुमचे पूर्वज आनंदात आहे आणि त्यांचा तुमच्या परिवारावर आशीर्वाद आहेत. तसेच तुमची कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत.
जर तुम्ही घराच्या छतावर अन्न खात असेल्याचा अर्थ तुमचे पूर्वज खूप आनंदात आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सुख, शांती, संपत्ती आणि धान्याने भरून जाईल.
एखाद्या वेळेस तुमच्या घराजवळ किंवा छतावर कावळा मृतावस्थेत आढळल्यास ते अशुभ मानले जाते. असे घडण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला एखादी वाईट बातमी ऐकायला मिळणे असा होतो.
जर कावळा तुमच्या घराजवळ, अंगणात, दारावर, खिडकीवर येऊन वारंवार ओरडत असण्याचे लक्षण म्हणजे तुमच्या घरामध्ये वाद, तणाव, नकारात्मकता असल्याचे लक्षण मानले जाते.
कावळ्याचे रडणे किंवा घराभोवती सतत फिरणे अशुभ देखील मानले जाते. कावळा घराभोवती फिरत राहण्याचा अर्थ असा होतो की, पूर्वज रागावले आहेत. यावेळी पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान, दान, तर्पण इत्यादी गोष्टी केल्याने पितृदोषापासून सुटका होते, असे देखील मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)