
फोटो सौजन्य- pinterest
काल भैरव जयंतीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. ज्याची तिथी मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला येते. हा दिवस बाबा काल भैरव यांना समर्पित आहे. या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते. यावर्षी, कालभैरव जयंती बुधवार 12 नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरी केली जाणार आहे. बरेच जण कालभैरवांची पूजा करतात. पण त्यांना हे माहीत नसते की कालभैरव हे कोणाचे रुप आहे आणि त्याची पूजा केल्याने कोणता फायदा होतो. जाणून घ्या कालभैरवांची पूजा करण्याचे फायदे
कालभैरव बाबा हे महादेवांचे भयंकर रुप आहे आणि शक्तिशाली रूप आहे, ज्यांना रक्षक आणि संरक्षक मानले जाते. कालभैरवाला “काळाचा स्वामी” म्हणूनही ओळखले जाते आणि तो नकारात्मक शक्ती आणि वाईट आत्म्यांचा नाश करतो. बाबा काल भैरव यांना तंत्र-मंत्राचे देवता आणि काशीचे पोलिस अधिकारी देखील मानले जाते. मान्यतेनुसार, ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिव यांनी ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापून त्यांना काशीचा कोतवाल बनवले अशी पौराणिक मान्यता आहे.
कालभैरव बाबांची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते अशी धार्मिक श्रद्धा आहे.
कालभैरव बाबांची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा, काळी जादू आणि वाईट शक्तींच्या प्रभावापासून संरक्षण होते.
असे मानले जाते की, कालभैरवाची पूजा केल्याने ज्ञात आणि अज्ञात शत्रूंवर विजय मिळवण्यास मदत होते.
कालभैरवाच्या पूजेमुळे शनि आणि राहू सारख्या ग्रहांमुळे होणाऱ्या अडथळ्यांपासून सुटका मिळते.
कालभैरव बाबांची पूजा केल्याने कायदेशीर बाबींमध्ये यश मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे.
कालभैरव पूजा मोठ्या आजारांपासून आणि दुःखांपासून सुटका मिळविण्यासाठी उपयुक्त मानली जाते.
कालभैरवाची पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायात यश आणि समृद्धी मिळते.
कालभैरवाची पूजा केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
बाबा कालभैरवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
काळभैरव उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याचे आशीर्वाद देतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)