फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार कार्तिक महिन्याची सुरुवात बुधवार 8 ऑक्टोबरपासून होत आहे आणि या महिन्याची समाप्ती 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा महिना खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, या महिन्यात जी व्यक्ती भगवान विष्णूंची विशेष पूजा करते त्या व्यक्तीला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो. कार्तिक महिन्याला दामोदर महिना असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार कार्तिक महिन्यात तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा का आहे महत्त्व, जाणून घ्या
कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि नकारात्मकता दूर होते. कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात, पूर्वज संतुष्ट होतात आणि घरात सुख-शांती राहते. तसेच रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पाने तोडू नये.
कार्तिक महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी, शक्यतो सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. हा दिवा तूप किंवा तिळाच्या तेलाने लावावा. शुद्ध गाईचे तूप वापरणे अधिक शुभ मानले जाते. या महिन्यात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे.
कार्तिक महिन्यात सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवे लावावेत. दिव्यासाठी शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल वापरावे. मोहरीचे तेल वापरणे टाळावे. ईशान्य दिशेला तुळशीच्या रोपाजवळ मातीचा, धातूचा किंवा पिठाचा दिवा ठेवावा. दिवा लावल्यानंतर, तुळशीची आरती करा. तुम्ही आरतीसाठी तोच दिवा वापरू शकता. कार्तिक महिन्यात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. रविवार आणि एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत किंवा पाणी अर्पण करू नये. कार्तिक महिन्यात तुळशीच्या रोपावर स्वस्तिक चिन्ह बनवणे देखील शुभ मानले जाते. तुळशीजवळ दीप प्रज्वलित केल्यानंतर “शुभं करोति कल्याणम्, आरोग्य धन संपदम्, शत्रु बुद्धी विनाशाय, दीप ज्योति नमोस्तुते”. या मंत्राचा जप करावा.
कार्तिक महिन्यात दिवा लावणे म्हणजे तुमच्या मनातून आणि आत्म्यामधून अंधार आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे. अंधार म्हणजे अज्ञान. यावेळी जे लोक भगवान विष्णूंसमोर दिवा लावून त्यांची योग्य पद्धतीने पूजा केली जाते. त्यांना अहंकार, लोभ, वासना आणि भौतिक जगापासून मुक्तता मिळते. आत्मा शुद्ध होतो आणि या काळात दिवा लावल्याने जीवनात शुभ आणि सकारात्मकता येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)