Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026: शीख धर्माचे लोक कशी साजरी करतात होळी? काय आहे यातील वेगळेपण

महाराष्ट्रात शीख समुदायाचे हिंदी -दी -चादरचे आयोजन राज्य सरकारने केले आहे. नवी मुंबई येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शीख समुदाय होळी कसा साजरा करतो. त्यांची होळी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे, याबद्दल जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 01, 2026 | 02:32 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शीख धर्माचे लोक कशी साजरी करतात होळी
  • शीख धर्मातील होळीमध्ये काय आहे वेगळेपण
  • होला मोहल्ला म्हणजे काय?
 

 

भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये होळीच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. पंजाबमध्ये होळी खूप वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. शीख समुदायाची होळी साजरी करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. शीखांच्या होळी साजरी करण्याच्या पद्धतीला ‘होला मोहल्ला’ म्हटले जाते. होला मोहल्ला म्हणजे काय आणि किती दिवस आणि कुठे हा सण साजरा केला जातो, ते जाणून घेऊया.

होळीचा सण भारतात खूप उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात होळीशी निगडीत वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात. उत्तर प्रदेशमध्ये होळीची वेगळी पद्धत आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये होळीची वेगळी पद्धत आहे. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये होळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. पंजाबमध्येही होळी साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे. पंजाबमध्ये होळी फक्त रंगांचा उत्सव नाही तर होळी पंजाबमध्ये शौर्याचे प्रतीक आहे. होळीच्या काळात इथे अनेक खेळ खेळले जातात. शीखांच्या होळी साजरी करण्याच्या पद्धतीला होला मोहल्ला म्हटले जाते. मार्च महिन्यातच होला मोहल्ला साजरा केला जातो.

होला मोहल्ला म्हणजे काय?

होला म्हणजे हल्ला, हा सण म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा दिवस आहे. आनंदपूर साहिब इथे तीन दिवस हा होळीचा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात तरुणांच्या वेगवेगळ्या कलांचे प्रदर्शन बघायला मिळते. वेगवेगळे खेळ, शक्ती प्रदर्शन यासोबतच इथे कीर्तन, गाण्यांचीही संगीत मेजवानी असते. लंगर सेवेद्वारे कायम अन्नदान केले जाते.

March Shubh Muhurat: मार्चमध्ये विवाह, गृहप्रवेश आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

धार्मिक महत्त्व

शीखांचा धार्मिक ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्या होला मोहल्लाचा उल्लेख आहे. या ग्रंथात लिहिले आहे की, होळी साजरी करणे म्हणजे देवाच्या जवळ जाणे आहे. होला मोहल्ला निहंग हा शीखांचा खास सण आहे. याला बंधूभाव आणि एकात्मतेचे प्रतीकही मानले जाते.

शीखांचे दहावे गुरु – गुरु गोविंद सिंह यांनी 1701 मध्ये वसंत ऋतुच्या काळात होला मोहल्ला साजरा करायला सुरुवात केली. गुरु गोविंद सिंह यांनी आपल्या अनुयायांना होळीच्या काळात आनंदपूर साहिब इथे बोलावले होते. तेव्हापासून या प्रथेला सुरुवात झाली. असे सांगितले जाते.

सणाची सुरुवात कशी झाली

होला मोहल्लाच्या काही दिवस आधीच आनंदपूर साहिबजवळ लोक एकत्र यायला सुरुवात होते. होळीच्या काळात इथे भाविकांसाठी खास शिबिराचे आयोजन केले जाते. लोक धान्य आणि इतर काही सामान घेऊन इथे गोळा होतात. धान्याचा बराचसा भाग ते लंगरसाठी दान करतात.

Holika Dahan 2026: होलिका दहन करताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? काय सांगते ज्योतिषशास्त्र

होला मोहल्ला उत्सव किती दिवस साजरा केला जातो

हा सण तीन दिवस साजरा केला जातो. पण याची तयारी आठ दिवस आधीच सुरू होते. शीखांचे शौर्य दाखवण्यासाठी इथे खोटी लढाई लढली जाते. या काळात तलवारबाजी केली जाते. रॅलीच्या काळात सगळ्यांच्या हातात तलवार असते. खोटे युद्ध संपल्यावर यात सहभागी झालेल्यांवर गुलाब पाणी, अत्तर, केशर पाणी आणि रंग टाकला जातो. निहंग शीखांचे वेगवेगळे ग्रुप इथे येतात. इथे येण्यासाठी ते अनेक वाहनांचा वापर करतात. काही जण दुचाकी घेऊन येतात तर काही जण ट्रॅक्टर घेऊन येतात. काही लोक बैलगाडीही घेऊन येतात.

या तीन दिवसांच्सा उत्सवात शीख युवकांना सैन्याचे शिक्षण दिले जाते. धनुर्विद्या, घोडेस्वारी यांच्या प्रशिक्षणाबरोबरच संगीत आणि काव्य यांच्या स्पर्धांनाही गुरू गोविंदसिंहांनी विशेष स्थान दिले. आजही याचे स्मरण म्हणून शीख सांप्रदायिक तीन दिवसांचा हा उत्सव जत्रा, स्पर्धा, मर्दानी खेळांनी साजरा करतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शीख धर्मात होळी कोणत्या नावाने साजरी केली जाते?

    Ans: शीख समुदायात होळीला होला मोहल्ला असे म्हटले जाते. हा सण शौर्य, संघटन आणि धार्मिक एकात्मतेचे प्रतीक मानला जातो.

  • Que: होला मोहल्ल्याची सुरुवात कोणी केली?

    Ans: शीखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांनी 1701 साली या परंपरेची सुरुवात केली, असे मानले जाते. त्यांनी अनुयायांना शौर्य आणि संघटनाचे धडे देण्यासाठी हा उत्सव सुरू केला.

  • Que: या सणाचे वेगळेपण काय आहे?

    Ans: इतर ठिकाणी होळी रंगांच्या उधळणीसाठी ओळखली जाते; मात्र शीख समुदायात हा सण शौर्यप्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी, मर्दानी खेळ आणि खोट्या युद्धांचे प्रात्यक्षिक हे मुख्य आकर्षण असते.

Web Title: Holi 2026 how do sikhs celebrate holi what is unique about it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • holi

संबंधित बातम्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
1

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
2

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
3

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश
4

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.