
फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांच्या हालचालींचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पडतो. आता गुरु ग्रह म्हणजे बृहस्पतिने 11 नोव्हेंबर रोजी कर्क राशीमध्ये प्रवेश केला आहे. आता डिसेंबर महिन्यापर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरुच्या या संक्रमणामुळे हंस राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची ही स्थिती 12 वर्षांनंतर होणार आहे. गुरुच्या या संक्रमणामुळे तयार होणार केंद्र त्रिकोण योग काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. गुरुचा कर्क राशीतील संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे ते जाणून घ्या
गुरुच्या संक्रमणाचा आणि केंद्र त्रिकोण राजयोगाचा मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तुम्ही जुन्या विचांराचा पुन्हा एकदा परत विचार कराल आणि निर्णय घ्या. कोणत्याही बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या संबंधामध्ये सुधारणा होईल. शैक्षिणक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहील. या काळात तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता.
कर्क राशीमध्ये गुरु ग्रह संक्रमण करणार आहे. याचा कर्क राशीच्या लोकांना लाभ मिळेल. यामुळे तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात विशेष लाभ होईल. तुम्हाला वाद किंवा तणावाचा सामना करावा लागू शकतो परंतु स्वतःवर नियंत्रण ठेवून तुम्ही ते टाळू शकता. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात तुम्हाला विविध क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
मीन राशीच्या कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण राजयोग दहाव्या घरामध्ये तयार होत आहे. गुरुच्या वक्री गतीचा तुम्हाला या काळात खूप फायदा होईल. गुरु हा तुमचा स्वामी ग्रह आहे त्याचा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम होणार आहे. तुम्ही भावनिक संघर्ष सोडवू शकाल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मान सन्मान मिळेल. धार्मिक कार्यक्रमात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: केंद्र त्रिकोण राजयोग 11 नोव्हेंबर रोजी तयार होणार आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत हे संक्रमण राहणार आहे
Ans: केंद्र त्रिकोण राजयोग 12 वर्षांनी तयार होत आहे
Ans: केंद्र त्रिकोण राजयोगामुळे मेष, कर्क आणि मान राशीच्या लोकांचे नशीब चमकेल