Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketu transit 2026: मेष आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांवर केतूचा होणार परिणाम, या क्षेत्रातील लोकांच्या वाढणार अडचणी

केतू 2026 च्या अखेरीपर्यंत सिंह राशीत राहणार आहे. 4 डिसेंबर 2026 रोजी तो सिंह राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. केतुच्या प्रतिकूल परिणामांना कोणत्या राशीच्या लोकांना सामोरे जावे लागेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 04, 2025 | 01:14 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 2026 मध्ये केतू करणार सिंह राशीत संक्रमण
  • केतूचा प्रतिकूल परिणाम
  • मेष आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांवर पडणार प्रभाव
 

 

2026 मध्ये केतू सिंह राशीमधून संक्रमण करेल. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात केतू राशी बदलेल. केतू वर्षभर सिंह राशीमध्ये राहणार आहे. ज्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार केतू हा मोक्ष देणारा देखील आहे, म्हणजेच जे काही घडेल त्याचे पूर्ण परिणाम मिळतील. म्हणून, वर्षभर केतू आणि शनि यांच्यात षडाष्टक योग तयार होणे शुभ मानले जात नाही. मेष आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांवर केतूचा प्रतिकूल परिणाम होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या घरामध्ये केतूचे संक्रमण पाचव्या घरामध्ये होणार आहे. याचा परिणाम मुलांशी आणि शिक्षणाशी संबंधित आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना घरगुती कलह आणि मानसिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. काही वाद किंवा संघर्षामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. आर्थिक लाभ कमी आणि खर्च जास्त असेल. मुलांशी संबंधित बाबींबद्दल तुमचे मन अस्वस्थ राहील.

Margashirsha Purnima: करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय

वृषभ रास

वृषभ राशीच्या चौथ्या घरामध्ये केतूचे संक्रमण होत आहे. घर, कुटुंब, वाहन आणि मालमत्तेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हा काळ वृषभ राशीच्या लोकांच्या अडचणीमध्ये वाढ करु शकता. यावेळी कौटुंबिक जीवनात तणावाचे वातावरण राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण बाराव्या घरात होणार आहे. ज्यामुळे खर्च, रुग्णालये, परदेश आणि लपलेले शत्रू यांच्याशी संबंधित बाबींवर परिणाम होईल. या काळात कन्या राशीच्या लोकांच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अनपेक्षित खर्चामुळे मानसिक ताण येऊ शकतो. या काळात लपलेल्या समस्या देखील उद्भवू शकतात.

धनु रास

धनु राशीच्या घरामध्ये हे संक्रमण नवव्या घरात होत आहे. हे घर नशीब, धर्म आणि प्रवासाचे प्रतिनिधित्व करते. या काळात धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात अडथळे येतील आणि खर्चही जास्त असेल. गाडी चालवताना जास्त काळजी घ्या. अपघातात दुखापत होण्याची शक्यता आहे. या काळात प्रवास करणे टाळावे.

Navpancham Yog: 12 वर्षांनंतर बुध आणि गुरु तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब

कुंभ रास

कुंभ राशीच्या घरामध्ये हे संक्रमण सातव्या घरामध्ये होत आहे. तुमच्या जोडीदारासोबत तणाव आणि लग्नात विलंब यासारख्या समस्या निर्माण करू शकतात. या काळात कौटुंबिक समस्या देखील वाढू शकतात. नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यामधील संघर्ष वाढू शकतो. ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो. वाहन किंवा प्रवासाशी संबंधित खर्च होण्याची शक्यता देखील आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या राशीच्या लोकांवर केतूचा प्रतिकूल परिणाम असणार आहे

    Ans: केतूचा प्रतिकूल परिणाम मेष, कुंभ, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर असणार आहे

  • Que: केतू प्रतिकूल असताना धनहानि होते का

    Ans: केतू भ्रम, गोंधळ आणि अचानक घडामोडीचा कारक आहे. त्यामुळे चुकीचे निर्णय, गुंतवणुकीत नुकसान, अडकलेले व्यवहार किंवा कायदेशीर अडथळे असू शकतात

  • Que: प्रतिकूल काळ किती वेळ टिकू शकतो

    Ans: केतूचे संक्रमण साधारणपणे 1.5 वर्षे एकाच राशीत राहते. त्यामुळे त्याचा प्रभावही याच काळात जाणवतो.

Web Title: Ketu transit 2026 adverse effects will be felt on people of these zodiac signs including aries and aquarius

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता
2

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या
3

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा
4

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.