फोटो सौजन्य- istock
सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावणातील प्रत्येक दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी आहे. ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी हेरंब संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. श्रावणातली पहिलीच संकष्टी चतुर्थी असल्याने या दिवशी शुभ संयोगही तयार होतील. संकष्ट चतुर्थी, मुहूर्त, पूजाविधी आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घेऊया.
संकष्ट चतुर्थी मुहूर्त
पंचांगानुसार, श्रावणातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाईल. गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी संकष्ट चतुर्थीतीची तिथी सुरु होईल तर 23 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी या व्रताची समाप्ती होईल.
पूजा करण्याची शुभ वेळ ही संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांपासून ते 7 वाजून 5 मिनिटांपर्यंत असणार आहे, तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9 वाजून २ मिनिटांचा असेल.
हेदेखील वाचा- ट्रायल रुम आणि मॉलच्या टॉयलेटमध्ये छुपे कॅमेरे तर नाही ना? जाणून घ्या सोप्या टिप्स
संकष्ट चतुर्थी पूजा
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य करून घ्या. देवघर स्वच्छ करा. देवघरातील देवांची मनोभावे पूजा करा. श्रीगणेशाचा जलाभिषेक करावा. गणपतीला फुले, फळे अर्पण करा आणि पिवळे चंदन लावा. तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करा. संकष्टी चतुर्थीची कथा वाचा. ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा. पूर्ण भक्तीभावाने गणेशाची आरती करा. सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करा. क्षमा प्रार्थना करा.
हेदेखील वाचा- जन्माष्टमीला तुम्हीसुद्धा लाडू गोपाळ घरी आणणार आहात का? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत, नियम
संकष्ट चतुर्थीचे महत्त्व
संकष्टी चतुर्थीचा अर्थ कठीण प्रसंगातून आराम मिळणे असा आहे. या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने खूप फलदायी असते. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केल्यास या व्रताचा पूर्ण लाभ होतो.
या मंत्राचा जप करा
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः ।
द्वैमातुरश्च हेरम्ब एकदन्तो गणाधिपः ॥
विनायकश्चारुकर्णः पशुपालो भवात्मजः ।
द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् ॥
विश्वं तस्य भवेद्वश्यं न च विघ्नं भवेत् क्वचित्