The 300-year-old idol of Lord Shiva and the Shivling are enshrined here.
गोंदिया( बिरसीफाटा ): गोंदिया-तिरोडा मार्गावर गंगाझरीपासून अवघ्या ५ किमी अंतरावर डोंगरावर वसलेल्या केरझिरा येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. दरवर्षी हजारो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. हे देवस्थान शिवभक्तांचे श्रद्धेचे केंद्र आहे. मात्र, कोविडच्या निर्बंधांमुळे या वर्षी बंदी घातली आहे. असे असतानाही १ मार्च रोजी महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्येने शिवभक्त पोहोचतील, असा अंदाज आहे.
[read_also content=”हिनाने पटकाविले नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय दौड स्पर्धेत सुवर्णपदक, आतापर्यंत तीन सुवर्ण पदकांची मानकरी https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/hina-wins-gold-at-international-race-in-nepal-three-gold-medalists-so-far-nraa-246747.html”]
नैसर्गिक संपत्ती आणि सौंदर्यात उंच टेकडीवर वसलेल्या भगवान शिवाच्या मंदिर येथे आहे. येथील भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंग ३०० ते ४०० वर्षे जुने असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. देवस्थान परिसरात बेलची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. महत्त्वाची बाब म्हणजे, या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा पद्मजातीचा वृक्षही आहे. संपूर्ण वनक्षेत्रात हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही. प्राचीन ग्रंथानुसार ऋषीमुनी पद्म वृक्षाच्या सान्निध्यात तपश्चर्या करत असत. त्यामुळे, केरझिरा क्षेत्राचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते.
[read_also content=”खोटे गुन्हे रद्द करा, उच्च न्यायालयाची पोलिसांना तंबी https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/cancel-false-charges-high-court-appeals-to-police-nraa-246030.html”]
घनदाट झाडांनी वेढलेल्या या परिसरात वर्षभर वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. शतावरी, मुसळी, अडुळसा, जंगली तुळशी, बहावा, गरुड फल्ली, आवळा, बेहाडा, हिरडा, सजा, बिजा आणि इतर मौल्यवान वनसंपदा या वनक्षेत्रात आढळते. गेल्या काही वर्षांत तिरोडा विभागाचे आमदार विजय रहांगडाले यांनी या देवस्थानच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले आहेत. तीर्थ क्षेत्र विकास निधीतून या संकुलातील भाविकांसाठी भक्त निवास आणि श्री गणेश, दुर्गा, विठ्ठल रुख्मिणी, आवारात महासरस्वती, राधाकृष्ण आणि साईबाबांची सुंदर मंदिरे बांधली आहेत. यावर्षी महाशिवरात्री या पवित्र सणावर शिव मंदिरात १ मार्च रोजी सकाळी ९ वाजता शिव अभिषेक व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड नियमांतर्गत सरकारी निर्देशांनुसार, यंदा केरझिरा येथे मेळा आयोजित करण्यात आलेला नाही. तरी शिवभक्त व निसर्गप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
[read_also content=”व्हॉट्सअप स्टेट्सच्या प्रतिक्रियेवरून झाला वाद, चक्क वरातीत घुसून झाडल्या गोळ्या आणि केला चाकूने हल्ला, सात आरोपींना अटक https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/controversy-erupts-over-whatsapp-states-response-nraa-246261.html”]
औषधी गुणधर्म पाणी
केरझिरा देवस्थानात नैसर्गिक पाण्याची टाकी आहे. जिथून वर्षभर पाणी नैसर्गिकरित्या वाहत असते. पाण्याच्या टाकीजवळ अनेक वर्षांपासून केळीची झाडे आहेत. त्यामुळे, या पवित्र स्थानाचे नाव ‘केरझिरा’ पडले आहे. या तलावाचे पाणी औषधी गुणधर्म असलेले आहे. अनेक जटिल आजारांवर उपयुक्त असल्याचेही परिसरातील ज्येष्ठांनी सांगितले आहे.