बोरन्हाण म्हणजे नक्की काय
मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो नवीन वर्षाचा पहिला सण आहे. दरवर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाते काहीवेळा मात्र हा दिवस 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. या दिवशी महिलांसाठी हळदीकुंकू परंपरा आणि पुरुष आणि मुलांसाठी पतंग उडवण्याची परंपरा आहे आपल्याकडे निभावली जाते. आपल्याकडे सगळ्याच वयोगटासाठी वेगवेगळे सण आणि परंपरा जपले जातात असं दिसून येते आणि यामध्येच मकर संक्रांतीचा सणही नक्कीच मागे राहिलेला नाही
परंतु या सर्वांमध्ये, विशेषतः अगदी लहान मुलांसाठी बोरन्हाणाची परंपरादेखील साजरी केली जाते, तर हे बोरन्हाण काय आहे आणि ते का साजरे केले जाते? पंडित नयनेश जोशी यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊया (फोटो सौजन्य – @rahulgadhave19 Instagram)
बोरन्हाणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून नवीन ऋतूची सुरुवात होते. पंडित नयनेश जोशी यांच्या मते, मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत नवजात बालकांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचा जन्म सोहळा केला जातो. ही परंपरा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे. गुरुजी म्हणतात की बोरन्हाण मुलांना निरोगी ठेवण्यासाठी एक प्रकारचे शारीरिक संरक्षण प्रदान करते.
मकर संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात घ्या हटके उखाणे, वाचा उखाण्यांची लिस्ट
बोरन्हाण आणि वैज्ञानिक कारण
बोरन्हाणाबद्दल एक मनोरंजक कथा देखील आहे. असे म्हटले जाते की एकेकाळी कारी नावाचा एक राक्षस होता. त्याची वाईट नजर आणि विचार मुलांवर पडू नयेत म्हणून, प्रथम कृष्णावर बोऱ्हण करण्यात आले आणि तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तरी मकर संक्रांतीच्या वेळी वातावरणात बदल होतात. या हवामान बदलांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी बोरन्हाणदेखील केले जाते. लहान मुलांवर वातावरणाचा परिणाम लगेच होतो आणि त्यामुळे हा विधी करण्यात येतो. यामध्ये मुलांच्या अंगावर ओतण्यात येणारे पदार्थ मुलं खातात आणि त्यातून त्यांना प्रतिकारशक्ती मिळते हेदेखील एक वैज्ञानिक कारण आहे
बोरन्हाणाचा विधी आणि मुलांचा उत्सव
मकर संक्रांतीच्या दिवशी मुलांचा बोरन्हाण पारंपारिक पद्धतीने साजरा केले जाते. या दिवशी मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी सजवले जाते आणि त्यांना चटईवर बसवले जाते आणि त्यांना औक्षण करण्यात येते. यानंतर, घरातील इतर मुलांना बोलावले जाते आणि त्यांच्या डोक्यावर चुरमुरे, बताशा, तीळ रेवडी, बिस्किटे, लहान बोरं आणि उसाचे तुकडे घातले जातात. या मुलांना हे स्वादिष्ट पदार्थ गोळा करण्याची संधी मिळते. या काळात अनेक खेळ खेळले जातात आणि बोरन्हाणाचा कार्यक्रम पूर्ण होतो.
लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीला परिधान करा सुंदर हलव्याचे दागिने, हळदीकुंकमध्ये दिसाल आकर्षक