१४ जानेवारीला संपूर्ण राज्यभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये हळदीकुंकू ठेवून वाण आणि तिळगुळ वाटले जातात. तर लहान मुलं या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये पंतग उडवतात. शिवाय नवीन लग्न झालेल्या नवदांपत्यांसाठी मकर संक्रांत हा सण आणखीनच खास असतो. शिवाय नवीन सून आणि जावयाचे लाड पुरवले जातात. नव्या सुनेला मकर संक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घालून सुंदर तयार केले जाते. हलव्याचे दागिने म्हणजे फुटाण्याचे दागिने तयार करून परिधान केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हलव्याच्या दागिन्यांच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. चला तर जाणवून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीला परिधान करा सुंदर हलव्याचे दागिने
मराठमोळा दागिना म्हणून नेहमीच नथीचे नाव सगळ्यात आधी घेतले जाते. त्यामुळे तुम्ही हलव्याचे दागिने परिधान करून सुंदर तयार होऊ शकता.
काळ्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाचे हलव्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतात. हातामध्ये बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या सौंदर्यात भर पडते.
संक्रांतीच्या दिवशी नव्या नवरीला हलव्याचे दागिने घालण्यास दिले जातात. त्यामध्ये नथ, बाजूबंद, हलव्याचे मंगळसूत्र, बांगड्या इत्यादी दागिने घातले जातात.
वेगवेगळ्या रंगाचे तिळगुळ वापरून तुम्ही कंबरपट्टा तयार करू शकता. काळ्या रंगाच्या साडीवर कंबरपट्टा अतिशय सुंदर दिसेल.
हलव्याच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र हा दागिना अतिशय सुंदर दिसतो. मंगळसूत्र घातल्यानंतर महिलांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.