मंगळ केतू युतीचा परिणाम (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
मंगळ आणि केतू हे अग्निमय ग्रह अतिशय अशुभ स्थितीत आहेत. केतू सिंह राशीत आहे आणि मंगळही सिंह राशीत आहे. युद्ध, हिंसाचार, विमान अपघात, भूस्खलन इत्यादी स्वरूपात मंगळ आणि केतूच्या युतीचा कहर संपूर्ण जगाने सहन केला आहे. परंतु आता पुढील ७ दिवस आणखी धोकादायक असणार आहेत असे ज्योतिषशास्त्र सांगते. अर्थात यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ आपण काय करत आहोत ते विचारपूर्वक करण्याची गरज आहे.
मंगळ आणि केतूच्या युतीला ज्योतिषशास्त्रात “कुज-केतू” किंवा “अंगारक दोष” म्हणून ओळखले जाते. ही एक शक्तिशाली युती आहे जी जातकाच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडू शकते. ही युती जातकाला ऊर्जावान, उत्साही आणि धैर्यवान बनवू शकते, परंतु त्याच वेळी काही आव्हाने आणि समस्यादेखील निर्माण करू शकते, म्हणजे नक्की काय ते आपण ज्योतिषाचार्य विनय बजरंगी यांच्याकडून जाणून घेऊया.
काय आहे सद्यस्थिती
खरं तर, २१ जुलै ते २८ जुलै या काळात मंगळ केतुवरून भ्रमण करेल, जी आणखी धोकादायक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत, या काळात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. २८ जुलै रोजी, जेव्हा मंगळ भ्रमण करून कन्या राशीत प्रवेश करेल, तेव्हा ही युती तुटेल आणि लोकांना काही प्रमाणात आराम मिळेल.
इतकंच नाही तर मंगळ-केतू शनिसोबतदेखील षडाष्टक योग बनवत आहेत. ज्यामुळे ही युती भयानक परिणाम देत आहे. क्रूर ग्रह शनि यावेळी वक्री स्थितीत आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव आता काहीसा कमी झाला आहे.
28 जुलैपर्यंत कहर! 2 उग्र ग्रह करणार उलथापालथ; 3 राशीच्या व्यक्तींचे जबरदस्त नुकसान
कोणत्या राशींवर परिणाम
मंगळ आणि केतूचा अशुभ युती ४ राशींच्या लोकांसाठी विशेषतः नकारात्मक आहे असे म्हणता येईल. या राशी मेष, सिंह, कन्या आणि मीन आहेत. २८ जुलैपर्यंतचा काळ या लोकांच्या करिअरवर अशुभ परिणाम करू शकतो. म्हणून तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. कोणत्याही गोष्टीत रागाने निर्णय घेऊ नका. जितके शांत राहता येईल तितके राहण्याची गरज आहे.
ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ, राहू आणि केतूची अशुभ स्थिती आहे त्यांनी विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या लोकांच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. त्यांचा कोणाशी वाद होऊ शकतो. त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यांचे करिअर अडचणीत येऊ शकते. त्यामुळे तुम्ही अगदी योग्य पद्धतीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
मंगळ आणि केतूच्या युतीचे संभाव्य परिणाम:
Mangal Gochar: मंगळाच्या संक्रमणाचा या राशीच्या लोकांवर होणार परिणाम, जाणून घ्या उपाय
मंगळ-केतू युतीसाठी उपाय:
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.