फोटो सौजन्य- फेसबुक
आज शनिवार, 7 जून रोजी मंगळ ग्रह आपली राशी बदलणार आहे. मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 28 जुलै रोजी रात्री 8.11 वाजेपर्यंत मंगळ सिंह राशीत राहील. मंगळाच्या हा राशी बदल तुमच्यासाठी 2 महिने हानिकारक ठरू शकतो. मंगळाच्या संक्रमणाचा परिणाम काही राशीच्या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. जसे की, तणाव, अपघात, आरोग्य बिघडणे, आग, वाद अशा कठीण परिस्थिती उद्भवू शकतात. मंगळाच्या या संक्रमणाचा परिणाम मेष राशीपासून मीन राशीपर्यंतच्या सर्व 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. मीन राशी वगळता सर्वांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे मंगळ ग्रहाच्या संक्रमणामुळे राशीनुसार काही उपाय जरुर करा.
मेष राशीच्या कुंडलीमध्ये मंगळ पाचव्या घरात आहे. यामुळे केतूशी त्याची युती होऊन तुमचे मन अशांत करू शकते. त्यामुळे तुम्ही लोकांनी दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. तसेच गूळ आणि हरभरा दान केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचसोबतच तुमचे रागावर नियंत्रण राहील आणि ऊर्जा संतुलित होईल.
मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये चौथ्या घरात संक्रमण करत आहे. राहू आणि केतू सारख्या ग्रहांचा मंगळावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांनी मंगळवारी मसूर आणि लाल कपडे दान केल्यास त्याचा त्यांना फायदा होईल. तसेच मंगळाच्या शुभ प्रभावामुळे कौटुंबिक सौहार्द अधिक वाढेल.
मिथुन राशीच्या कुंडलीत मंगळ तिसऱ्या घरात संक्रमण करता आहे. हे संक्रमण कधी तरी चांगले परिणाम देणारे असू शकते. यावेळी लाल फुलांनी हनुमानाची पूजा केल्यास हनुमान प्रसन्न होते. नंतर तांब्याचे भांडे दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे रक्तदाब सुधारेल आणि वाणीत शुद्धता येते.
कर्क राशीच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचे संक्रमण दुसऱ्या घरात होत आहे. त्याचप्रमाणे मंगळ हा एक चांगला ग्रह मानला जातो, तरीही दुसऱ्या घरात मंगळाचे संक्रमण चांगले मानले जात नाही. या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर जल अर्पण करून लाल चंदनाचा लेप लावावा. यामुळे तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता दोन्ही दूर होण्यास मदत होते.
सिंह राशीच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचे संक्रमण पहिल्या घरात होत असल्याने ते सामान्यतः चांगले मानले जात नाही. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मंगळाच्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर लाल डाळ दान करणे शुभ मानले जाते. यामुळे तुमची नेतृत्व क्षमता वाढण्यास मदत होते.
कन्या राशीच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचे संक्रमण बाराव्या घरात होत आहे. साधारणपणे, बाराव्या घरात मंगळाचे संक्रमण चांगले मानले जात नाही. असे म्हटले जाते की मंगळ अनावश्यक खर्च करू शकतो. म्हणून मंगळवारी भगवान शिवाचा अभिषेक आणि हनुमानाची पूजा करावा. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअरमध्ये स्थैर्य प्राप्त होईल. जुने आजार बरे होतील
कन्या राशीच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाचे संक्रमण नवव्या घरात होत आहे. हे संक्रमण चांगले परिणाम देणारे आहे. या संक्रमणामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळण्यास मदत होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांना मंगळाचे हे संक्रमणात कमीत कमी 5 मंगळवारी गूळ आणि तांबे दान करावे. यामुळे अचानक होणाऱ्या अपघातांपासून तुमचे रक्षण होण्यास मदत होईल. काहीही अनुचित प्रकार घडणार नाही.
धनु राशीच्या लोकांनी मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा परिणामावर उपाय म्हणून मंदिरात लाल फुले अर्पण करा आणि रुद्राभिषेक करा. यामुळे तुम्हाला जमिनीशी संबंधित बाबींमध्ये यश प्राप्त होईल.
मकर राशीच्या लोकांनी लाल चंदनाचा टिळा लावावा आणि मंगल मंत्राचा जप करावा. यामुळे न्यायालयीन प्रकरणांतून तुमची सुटका होण्यास मदत होईल.
कुंभ राशीच्या लोकांनी मंगळवारी लाल मिरची आणि डाळ दान करणे तुमच्यासाठी चांगले राहील. हा उपाय केल्याने राग आणि अस्वस्थता कमी होईल.
मीन राशीच्या लोकांनी मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा परिणामावर उपाय म्हणून शिव मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन घ्यावे. त्यानंतर त्यांनी रक्तदान करावे. या उपायाने आत्मविश्वास वाढेल आणि भीती दूर होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)