
फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, एका वर्षात 12 अमावस्या असतात त्यामधील मार्गशीर्ष अमावस्येला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या अमावस्येच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासून, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची, दान करण्याची आणि पूर्वजांना प्रार्थना करण्याची परंपरा आहे. अमावस्येच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा केल्याने पूर्वजांना समाधान मिळते असे मानले जाते. यावेळी 2025 वर्षातील शेवटची अमावस्या आहे. या दिवशी राशीनुसार दान करणे खूप शुभ मानले जाते. मार्गशीर्ष अमावस्येला राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या
पंचांगानुसार, मार्गशीर्ष अमावस्येची सुरुवात शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी पहाटे 4.59 वाजता होणार आहे आणि त्याची समाप्ती 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.12 वाजता होणार आहे. अशा वेळी मार्गशीर्ष अमावस्या 19 डिसेंबर रोजी आहे.
मेष राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी उबदार कपडे, ब्लँकेट आणि गरम अन्नाचे दान करावे. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते.
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी गरजूंना पैसे आणि अन्न दान करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी उसाचा रस आणि पाण्याशी संबंधित वस्तूंचे दान करावे
कर्क राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी पांढरे अन्न आणि शक्य तितक्या पैशांचे दान करावे.
सिंह राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी गूळ, हरभरा आणि मध यांचे दान करावे. त्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या दूर होण्यास मदत होते असे म्हटले जाते.
अमावस्येच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी तुपात बनवलेल्या हिरव्या पदार्थांचे दान करावे. त्यामुळे करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्यास मदत होते.
तूऴ राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि गरजूंना पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी गूळ, लाल वस्त्र इत्यादी गोष्टींचे दान करावे. त्यामुळे व्यवसायात वाढ होण्यास मदत होते.
धनु राशीच्या लोकांनी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी मिठाई, केळी आणि पिवळ्या कपड्यांचे दान करावे. त्यामुळे तुमची प्रलंबित काम लवकर पूर्ण होतात.
अमावस्येच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी काळे चणे, तीळ इत्यादी दान करणे शुभ मानले जाते. या गोष्टींचे दान केल्याने आरोग्याला देखील फायदा होतो.
कुंभ राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी पैसे आणि जोडे दान करावेत. त्यामुळे लवकरच शुभवार्ता मिळू शकते.
मीन राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी उबदार कपडे आणि अन्नपदार्थाचे दान करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मार्गशीर्ष अमावस्या ही वर्षाच्या शेवटी येत असल्याने ती विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी दान, पितृतर्पण आणि उपाय केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात व कर्जमुक्तीचे योग तयार होतात.
Ans: अमावस्येला केलेले दान अनेकपटीने फळ देते. विशेषतः कर्ज, आर्थिक ताण, नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर करण्यासाठी दान अत्यंत प्रभावी मानले जाते.
Ans: राशीनुसार योग्य दान केल्यास कर्जातून सुटका, आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि नवीन वर्षासाठी सकारात्मक सुरुवात होऊ शकते.