फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार केतूला छाया ग्रह मानले जाते. जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अचानक होणाऱ्या बदलांचे आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की केतूच्या संक्रमणाचा राशींवर विशेष प्रभाव पडतो. यामुळे काही राशींसाठी आव्हाने वाढतात, तर काहींना अनपेक्षित फायदेदेखील मिळू शकतात. केतूच्या प्रभावामुळे काही राशीच्या जीवनात प्रगती होताना दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 मध्ये केतूचे पहिले महत्त्वाचे संक्रमण जानेवारीमध्ये झाले होते. त्यानंतर ते 25 जानेवारी 2026 रोजी पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रवास करेल आणि पहिल्या टप्प्यात त्याचे स्थान घेणार आहे. ज्यावेळी केतू या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळी काही राशीच्या लोकांना व्यवसायात आर्थिक लाभ, रखडलेल्या प्रकल्पांमध्ये प्रगती आणि करिअरमध्ये प्रगती अनुभवता येते. जाणून घ्या केतूच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.
वृषभ राशीसाठी केतूचे संक्रमण खास राहणार आहे. या काळात तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुमचे मन धार्मिक कार्यात गुंतलेले असेल. या काळात तुम्ही नवीन गुंतवणूक योजना बनवाल आणि वाहन खरेदी करू शकता. या काळात घरामध्ये शुभ घटना घडू शकतात. विक्री, विपणन या क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. गुंतवणुकीतूनही चांगले परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल राहणार आहे.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहणार आहे. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही एक नवीन व्यवसाय सुरू कराल आणि तुमच्या कुटुंबासाठी काही योजना राबवाल. तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते. तुमच्या कामात येणारे कोणतेही अडथळे दूर होतील. यशासाठी तुमचे सर्व प्रयत्न फळाला येतील. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या इच्छेनुसार संधी मिळू शकते. एखाद्या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यात यश मिळू शकते.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. या काळामध्ये तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये दिशा बदलण्यासाठी हा काळ चांगला राहणार आहे. या काळात तुम्हाला भावडांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा मोठी गुंतवणूक करु शकता. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: केतू ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्याला केतू गोचर म्हणतात. केतू हा अध्यात्म, वैराग्य, अचानक बदल आणि कर्मफळ देणारा ग्रह मानला जातो.
Ans: यावेळी केतू अनुकूल स्थितीत असल्याने काही राशींना अचानक यश, अडचणींमधून मुक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे.
Ans: काही राशींना करिअरमध्ये अनपेक्षित संधी मिळतील, तर व्यवसायात नवीन दिशा आणि स्थैर्य येईल.






