
फोटो सौजन्य- pinterest
मराठी दिनदर्शिका पाहिली तर लक्षात येईल असा एकही महिना नाही, ज्यात सण, उत्सव, व्रत वैकल्य नाहीत. मनुष्य हा उत्सव प्रेमी आहे, हे लक्षात घेऊन आपल्या पूर्वसुरींनी संसार आणि परमार्थाची गुंफण करत अतिशय सुंदर आखणी केली आहे. त्यातीलच एक मार्गशीर्ष महिना त्यात 90 प्रकारच्या व्रतांनी खचून भरलेला आहे. त्यातच 21 नोव्हेंबरपासून खंडोबाचे नवरात्र सुरू होत असून त्याच दिवशी देवदिवाळीही साजरी करण्यात येते. ‘मार्गशीर्ष हा लक्ष्मीचा महिना. संस्कृतमध्ये मार्गशीर्षाला ‘केशव मास’ म्हटले गेले, कारण लक्ष्मीसमवेत पितांबरधारी विष्णूही हेमंताचे स्वागत करतात.
जेजुरीच्या खंडोबाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून एकूण सहा दिवसांचे जे पूजन होते. त्यालाही ‘खंडोबाचे नवरात्र असेच म्हटले जाते. पहिल्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. मणि-मल्ल या दोन दैत्यांनी लोकांचा अपार छळ केला. त्यावेळी भगवान शिवशंकर खंडोबाच्या रूपात योद्धा बनून आले. त्यांचे या दोन्ही दैत्यांबरोबर सहा दिवस घनघोर युद्ध झाले. त्यात दोन्ही दैत्य मारले गेले. तो दिवस चंपाषष्ठीचा होता. त्या युद्धातील शिवशंकरांच्या विजयाची आठवण म्हणून भक्तभाविक आजदेखील चंपाषष्ठीला फार मोठा उत्सव करतात. या दिवशी खंडोबाची जत्रा भरते. मुळात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मिळून खंडोबाची एकूण 12 स्थाने असली, तरीही जेजुरीला भाविकांमध्ये आगळे स्थान आहे.
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला शिव-गौरी यांची तांदळाच्या पिठापासून मूर्ती तयार करून त्याची पूजा करतात. अन्यथा नामः स्मरण करून मानसपूजा देखील करतात, सुखी संसार, धन, धान्य, संपत्ती, भरभराट यासाठी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला ही मानसपूजा बांधली जाते. द्वितीयेला पितृपूजन केले जाते. म्हणजेच सर्व पितरांचे स्मरण करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तृतीयेला फलत्याग नावाचे व्रत आहे. या व्रतात, वर्षभरासाठी फळांचा त्याग केला जातो.
मार्गशीर्ष षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हटले जाते यावेळी दान दिले जाते. या दिवशी प्रावरणषष्ठी वत असते. ब्रह्मदेवांसाठी कमळ पुण्याचे
त्यानुसार वस्त्र दान केले जाते. वस्त्र दान कोणाला? तर थंडीच्या दिवसात वस्त्राअभावी, उबदार कपड्यांअभावी हुडहुडणाऱ्या लोकांना शाल, पांघरुण, लोकरीचे कपडे दान देता येतात.
तसेच देवालाही लोकरीचे कपडे घातले जातात. दशमीला रविवार असल्यास दशादित्यव्रत केले जाते. इंद्र, कुबेर यांच्यासह दहा दिशांच्या देवतांची पूजा केली जाते.
पंचमीला नागदिवाळी हा पारंपरिक कुलाचार, सोहळा केला जाती. या दिवशी श्रावणातील नागपंचमीप्रमाणे मार्गशीर्षातील पंचमीला नागाची पूजा केली जाते. घरातील पुरुषांच्या नावे पक्वान्न करून त्याव्या दीर्घायुष्यासाठी ते पक्क्वान्न गोरगरीबाला दान दिले जाते. तसेच या तिथीला ‘श्रीपंचमी’ देखील म्हणतात. श्रीपंचमीला लक्ष्मीची पूजा केली जाते. या तिथीला कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला, म्हणून ही तिथी महातिथी’ म्हणूनही ओळखली जाते.
सप्तमी सूयांशी संबंधित आहे. सूर्यपूजा केली जाते. अष्टमीला दत्तक्षेत्री दत्तात्रेयांच्या नवरात्रीच्या व्रतोत्सवाला प्रारंभ होतो. त्याची समाप्ती पौर्णिमेला होते. नवमीला चंडिकेची पूजा करतात.
Ans: मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवार 21 नोव्हेंबरपासून झाली आहे
Ans: मार्गशीर्ष महिन्याला संस्कृतमध्ये केशव मास म्हणतात
Ans: जेजुरीच्या खंडोबाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून एकूण सहा दिवसांचे जे पूजन होते. त्यालाही 'खंडोबाचे नवरात्र असेच म्हटले जाते.