फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमीचे व्रत पाळले जाते. या दिवशी भगवान शंकराचे उग्र रूप असलेल्या काळभैरवाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तसेच या दिवशी कालभैरवाची पूजा करुन काही उपाय केल्यास त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. मासिक कालाष्टमीच्या दिवशी कोणते उपाय करावे, जाणून घ्या.
पंचांगानुसार, शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी रात्री 11.49 वाजता सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.24 वाजता होईल. उद्यतिथीनुसार कालाष्टमीचे व्रत यावेळी शनिवार, 16 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.
कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे भय आणि त्रास दूर होतात. मान्यतेनुसार, कालभैरवाची पूजा केल्याने ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना नकारात्मक शक्तींपासून वाचवतात. कालष्टमीच्या दिवशी भगवान भैरवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या काळात काही उपाय केल्याने शनि आणि राहूचे वाईट प्रभाव कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. मासिक कालाष्टमीच्या दिवशी भक्तांनी काही उपाय केल्याने त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, असे मानले जातात. हा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.
जर व्यक्तीच्या जीवनात सुख-सुविधांमध्ये वाढ होत नसेल तर त्यांनी कालाष्टमीच्या दिवशी मातीच्या दिव्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा असताना ओम ह्रीम बटुकाय अपदुद्धरणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीम ओम’ या मंत्रांचा जप करावा. यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होईल.
जर घरामध्ये शांतीचे वातावरण राहत नसेल. वारंवार भांडण होत असतील किंवा इतर समस्या उद्भवत असतील तर कालाष्टमीच्या दिवशी महादेवाच्या मूर्तीसमोर बसून शिव चालिसाचे पठण करावे. असे केल्याने कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. त्यासोबतच शिवाचे उग्र रूप शांत होऊन ते प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
जर तुमची तब्येत वारंवार बिघडत असेल किंवा तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलात बुडवलेली भाकरी खाऊ घाला. भाकरीवर तेल लावताना काळभैरवाचे ध्यान करा. असे केल्याने लवकरच तुमचे आरोग्य सुधारेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)