फोटो सौजन्य- pinterest
आश्विन शिवरात्रीचा पवित्र सण शुक्ल महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन शिवरात्रीच्या दिवशी सिद्ध योग तयार होईल. यावेळी साधी योग आणि आश्लेषा नक्षत्रही आहे. शिवपूजेत भद्रा आणि राहुकाल यांना मान्यता नाही कारण महादेव स्वतः महाकाल आहेत, त्यांची पूजा कधीही करता येते. अश्विन महिन्यातील शिवरात्र कधी आहे, कोणत्या शुभ योगामध्ये पूजा करता येईल, कोणते फायदे होतील, जाणून घ्या
पंचांगानुसार, आश्विन कृष्ण चतुर्दशी तिथीची सुरुवात शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी रात्री 11.36 वाजता सुरु होणार आहे. या तिथीची समाप्ती शनिवार, 20 सप्टेंबर रोजी रात्री 12.16 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यतिथीनुसार शिवरात्री शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी आहे.
19 सप्टेंबर रोजी अश्विन शिवरात्रीचा निशिता पूजा मुहूर्त सकाळी 11.51 ते 12.38 पर्यंत आहे. मंत्रांच्या यशासाठी निशिता मुहूर्त सर्वोत्तम मानला जातो. आश्विन शिवरात्री ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.34 ते 5.21 पर्यंत असेल. तसेच शुभ मुहूर्त आणि अभिजित मुहूर्त सकाळी 11.50 ते दुपारी 12.39 पर्यंत असेल.
सिद्ध योग आणि सधी योग अश्विन शिवरात्रीच्या दिवशी तयार होत आहे. सिद्ध योगाची सुरुवात रात्री 8.41 वाजता होत आहे. त्यानंतर साधी योगाची सुरुवात होईल. हे दोन्ही शुभ योग मानले जातात. सिद्धी योग शुभ मानला जातो. आश्लेषा नक्षत्र पहाटेपासून सकाळी 7.5 वाजेपर्यंत राहील.
पंचांगानुसार आश्विन शिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, गुरु पुष्य योग, अमृत योग आणि अमृत सिद्धी शुभ योग तयार होत आहेत. त्याचबरोबर अभिजीत मुहूर्त आणि माघा नक्षत्रामुळे महादेव आणि पार्वतीची पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
अश्विन शिवरात्रीच्या रात्री भद्रा लागत आहे. भद्राच्या काळाची सुरुवात रात्री 11.36 वाजता होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 सप्टेंबर रोजी सकाळी 6.8 वाजता संपेल. या काळात कोणतेही शुभ कार्य करु नये. कारण असे मानले जाते की, या काळात भद्रा पृथ्वीवर राहते.
असे मानले जाते की शिवमंदिरात जाऊन किंवा घरामध्ये महादेवांची पूजा करुन आणि शिवमंत्रांचा जप केला जातो. मासिक शिवरात्रीच्या पूजेनंतर, ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि नंतर स्वतः जेवावे. जो कोणी भक्त पूर्ण भक्तीने हे व्रत करतो त्याचे सर्व त्रास दूर होतात. हे व्रत केल्यामुळे व्यक्तीला दीर्घायुष्य, समृद्धी, आरोग्य आणि संतती इत्यादी प्राप्त होते. तसेच हे व्रत करणाऱ्या लोकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)