फोटो सौजन्य- pinterest
आज बुधवार, 17 सप्टेंबरचा दिवस खास राहील. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आणि विश्वकर्मा जयंती देखील आहे. सूर्य आज कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुधासोबत संयोग होऊन बुधादित्य योग तयार होईल. चंद्राचे संक्रमण कन्या राशीत होत असल्याने गौरी योग आणि दुरुधार योग तयार होईल. तर सूर्यामुळे उभयचारी योग तयार होईल. या शुभ योगामुळे वृषभ, मिथुन, कर्क, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. बुधवारच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. नोकरीत तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. धाडसी निर्णय घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला कोर्ट-संबंधित प्रकरणांमध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सहकार्याचा आणि मार्गदर्शनाचा फायदा होईल. तुमच्या मोठ्या भावाकडूनही तुम्हाला पाठिंबा आणि लाभ मिळू शकतात. तुमचे वैवाहिक जीवन गोड राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. करिअरमध्ये तुमची प्रगती होऊ शकते. तुमच्या योजना यशस्वी झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला व्यवसायातही अपेक्षित यश मिळेल. वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. या काळात तुम्ही वाहनाची खरेदी करु शकता.
कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचे अचूक निर्णय आणि कार्यक्षमता तुम्हाला नफा मिळविण्यात मदत करतील. तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कलेसाठी तुम्हाला प्रोत्साहन आणि मान्यता मिळू शकते. तुम्ही काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस अनुकूल असेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आज तुमच्यावरील प्रभाव वाढलेला राहील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचा प्रभाव आणि वर्चस्व कायम राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. अकाउंटिंग, व्यवस्थापन, प्रशासन किंवा लेखन या क्षेत्रात गुंतलेले असाल तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. व्यावसायिक भागीदारांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जे लोक भागीदारीमध्ये काम करण्याचा विचार करत आहे त्यांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. सरकारी क्षेत्रात कोणतेही काम असल्यास ते वेळेवर पूर्ण होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)