
फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 1 डिसेंबरचा दिवस. आज मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी आहे. आज चंद्र मीन राशीमध्ये संक्रमण करणार आहे. गुरु आणि चंद्र यांच्यामध्ये राशी परिवर्तन योग तयार होणार आहे. गुरु आणि मंगळ दोघेही पंचमहापुरुष राजयोग तयार करत आहे. त्यासोबतच रेवती नक्षत्राच्या युतीमुळे व्यतिपात योग तयार होणार आहे. पंचमहापुरुष योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. करिअरमध्ये तुमची प्रगती होईल. आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. पूर्वी वाचवलेल्या पैशाचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुमच्यावरील आदर वाढेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून लाभ मिळू शकतो. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळतील. किराणा व्यवसायातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. तुम्ही काही नवीन संपर्क देखील बनवाल जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळेल. तुम्ही एक अतिशय महत्त्वाचे काम पूर्ण कराल. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पाठिंबा मिळू शकेल. आज तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची प्रलंबिक कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांकडूनही पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. तुमच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळेल. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. सरकारी कामातही तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)