नागपंचमी पूजा
यावर्षी नागपंचमी शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह शिवाची पूजा केली जाते. याशिवाय नागपंचमीचा दिवस काल सर्प दोष दूर करण्यासाठीही अतिशय शुभ मानला जातो.
नागपंचमीचा दिवस खूप खास असतो, केवळ संपूर्ण कुटुंबालाच नाही तर काही वेळा या दिवशी केलेल्या चुकांचे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य असलेल्या गोष्टी करू नका. यासाठी गुरूजी सिद्धार्थ मणेरीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
हेदेखील वाचा – कालसर्प योग काय आहे जाणून घ्या आणि त्याचे उपाय
कधी आहे नागपंचमी?
पंचांगानुसार नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा नागपंचमी ९ ऑगस्टला आहे. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात. पैसे येण्याची शक्यता असते असे मानले जातात. आजही गावागावांमध्ये नागदेवतेच्या बिळांपाशी जाऊन पूजा केली जाते. शेतकरी नागाला पूजतात आणि मगच शेतातमध्ये काम करतात.
हेदेखील वाचा – कुंडलीत असेल पातक कालसर्प दोष, भोगावे लागतील त्रास, सोप्या उपायांनी मिळेल मुक्तता
नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत?
या गोष्टी टाळल्यास कालसर्पाचा दोष तुमच्या कुंडलीत येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला त्रास होऊ नये यासाठी या गोष्टींची काळजी घ्यावी.