Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या व्रताचे खास नियम

Navratri 2026: यंदाची शारदीय नवरात्र ११ ऑक्टोबर २०२६पासून सुरू होणार असून २० ऑक्टोबरला दसरा आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि अनेक जण उपवास करतात. मात्र उपवास म्हणजे केवळ अन्न न खाणे नसून मन, बोलणे आणि वागणे सात्विक ठेवणे

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 29, 2026 | 02:09 PM
Navratri 2026_ नवरात्रीत उपवास करताय_ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Navratri 2026_ नवरात्रीत उपवास करताय_ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शारदीय नवरात्र ११ ऑक्टोबरपासून, तर दसरा २० ऑक्टोबरला.
  • उपवासात सात्विक आहार, संयम आणि शिस्त पाळण्यावर लेखात भर.
  • उपवास सोडताना कन्या पूजनाची पद्धत लेखात सांगितली आहे.
प्रतिपदा १० ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी सुरू होईल आणि ११ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी संपेल. हा नवरात्रीचा पहिला दिवस रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ ला असेल. आणि शेवटचा दिवस म्हणजे दसरा २० ऑक्टोबरला आहे. ११ ते २० ऑक्टोबर हे नऊ दिवस देवीचे असतील. पितृपक्ष संपला की सगळ्यांना नवरात्रीचे वेध लागतात. देवीचे नऊ दिवस, सगळीकडे लाईटिंग, फुलं, गरबा. यंदा शारदीय नवरात्र ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होत आहे आणि २० ऑक्टोबरला संपणार आहे. या नऊ दिवसात लोक देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि बरेच लोक उपवास पण करतात. Navratri 2026:

उपवास म्हणजे नक्की काय?

पण उपवास म्हणजे फक्त खाणं बंद करणं नाही. त्याचे काही नियम आहेत. ते नियम पाळले तरच उपवासाचं फळ मिळतं. नाहीतर फक्त भूक मारल्यासारखं होतं.उपवास म्हणजे नक्की काय?आपल्या धर्मात सांगितलं आहे की उपवास म्हणजे पोटाला उपाशी ठेवणं नाही. तर मनाला शांत ठेवणं. वाईट बोलणं टाळणं, वाईट वागणं टाळणं. नऊ दिवस मन, बोलणं आणि वागणं सगळं सात्विक ठेवायचं. देवीला हेच आवडतं.

उपवास करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

१. दिवसातून एकदाच फराळ करा
बरेच लोक सारखे सारखे खातात आणि म्हणतात उपवास आहे. असं करू नका. उपवास असेल तर दिवसातून एकदाच पोटभर फराळ करा. सारखं खात राहिल्याने उपवास मोडल्यासारखा होतो आणि त्याचं पुण्य पण कमी होतं.

२. वाईट गोष्टींना हात लावू नका
या नऊ दिवसात मटण, चिकन, मासे, अंडी पूर्ण बंद करा. सिगारेट, गुटखा, तंबाखू याला तर अजिबात हात लावू नका. खूप तिखट, खूप तेलकट खाणं पण टाळा. देवीच्या दिवसात हे सगळं वर्ज्य मानतात.

३. पाणी सारखं पिऊ नका
तहान लागली तर पाणी प्या, पण सारखं सारखं पाणी पिणं पण टाळावं. काही लोक उपवासात सारखं पाणी पितात, त्याने पण व्रत हलकं होतं असं सांगतात. गरज असेल तेव्हाच पाणी घ्या.

४. शक्य असेल तर अनवाणी राहा
जुने लोक नवरात्रीत चप्पल घालत नव्हते. नऊ दिवस अनवाणी राहायचे. आजकाल ऑफिसमुळे सगळ्यांना जमेलच असं नाही, पण घरी असताना तरी चप्पल न घालता राहण्याचा प्रयत्न करा. याने शरीरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

५. हलकं आणि सात्विक खा
उपवासाला काय चालतं? साबुदाणा खिचडी, वरईचे तांदूळ, फळं, दूध, शेंगदाणे हेच पदार्थ खा. बाहेरचं तळलेलं, पॅकेटमधलं खाणं टाळा. घरी बनवलेलं साधं खाणं सगळ्यात उत्तम आहे.

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

मध्ये उपवास सोडायचा असेल तर काय करायचं?

कधी कधी तब्येत बिघडते किंवा काही कामामुळे उपवास पूर्ण करता येत नाही. अशावेळी अर्धवट सोडून देऊ नका. देवीसमोर हात जोडून माफी मागा. “आई माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर” असं मनापासून सांगा आणि मगच उपवास सोडा.जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला उपवास सोडत असाल तर एक महत्वाचा विधी करावा लागतो. त्याला कन्या पूजन म्हणतात.

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

नऊ लहान मुलींना घरी बोलवा. त्यांचे पाय धुवा, त्यांना हळद कुंकू लावा. त्यांना जेवायला वाढा – पुरी, भाजी, हलवा यांचा नैवेद्य द्या. एखादी छोटी भेटवस्तू द्या. असं केलं की तुमच्या उपवासाचं फळ पूर्ण मिळतं. मुलींमध्ये देवीचाच अंश असतो असं मानतात. शेवटी एकच सांगायचं, नवरात्र म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही. तर स्वतःच्या मनाला स्वच्छ करणं आहे. नऊ दिवस भक्ती, शिस्त आणि संयम ठेवला तर देवी नक्कीच प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी येते.

Web Title: Navratri 2026 fasting rules sattvik food kanya pujan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Navratri
  • navratri day
  • navratri fesitival

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
1

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
2

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी
3

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.