फोटो सौजन्य- pinterest
आज 11 सप्टेंबरचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज मूलांक 2 असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव दिसून येईल. आज गुरुवार असल्याने आजचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. मूलांक 2असणाऱ्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी काही बदलांना सामोरे जावे लागेल. तर मूलांक 3 असणाऱ्या लोकांना कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक राहील. ज्यामुळे तुम्ही आज पूर्ण दिवस व्यस्त राहाल. मात्र वादविवादांमुळे तुमच्यावर मानसिक तणाव येऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही वाद घालणे टाळा.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. जे लोक खेळांशी संबंधित आहे त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे तुम्हाला भविष्यात अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बदल दिसू शकतात. विचारपूर्वक कोणतेही निर्णय घेऊ शकता.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी महत्वाची काम पूर्ण करण्यासाठी संभाषण साधावे लागेल. अन्यथा तुमचे काम अपूर्ण राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुमची स्थिती राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते. तुम्ही गरजूवंतांची मदत कराल
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला गुंतवणुकीमध्ये अपेक्षित लाभ होईल. तुम्ही एकांतात वेळ घालवल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात महत्त्वाची काम पूर्ण न होण्याने तुम्हाला ताण जाणवू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी छोटया छोट्या प्रकल्पांमधून लाभ होऊ शकतो. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. काम किंवा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या बाबत्तीत तुम्हाला अनावश्यक बाबतीत दूर राहायला हवे.
मुलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात मित्रांसोबत मिळून नवीन योजना आखू शकता. कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावे लागू शकते. खूप मेहनत घेतल्यास तुम्हालाअपेक्षित यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर आजुबाजूच्या लोकांवर प्रभाव राहील. कुटुंबासोबत तुम्ही बाहेर जाऊ शकता आणि घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. आर्थिक बाबतीत तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)