फोटो सौजन्य- pinterest
आजचा रविवारचा दिवस खास असणार आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्याचा अंक 6 आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव राहील. आजचा रविवारचा दिवस त्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे सूर्याचा अंक 1असतो. आज मूलांक 1 असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आणि नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकते. तर मूलांक 6 असणाऱ्या लोकांना आर्थिक बाबतीत मोठे निर्णय घेताना सावध राहावे लागेल आणि व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. एखाद्या नवीन व्यक्तीची ओळख होईल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमची प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. लोखंडाच्या संबंधित काम करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला मित्र आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला कठीण समस्यांचा सामना करावा लागेल. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. जुने मित्र भेटू शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. व्यवसायामध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात एखाद्या गोष्टीवरून तणाव राहू शकतो.
मूलांक 7 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायात प्रगती होईल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. कामाच्या ठिकाणी तुमचे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकते. ज्यामुळे तुमच्यावरील तणाव कमी होऊ शकतो. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही केलेल्या नवीन ओळखीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. नवीन संपर्कांच्या मदतीने तुम्ही समस्या सोडवू शकता त्यामुळे तुमच्यावरील ताण कमी होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)