हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठं महत्व दिलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील ग्रहांचा व्यक्तीच्या आयुष्यावर आणि स्वभावावर देखील परिणाम होत असतो. प्रत्येक ग्रहाचे काही ना काही गुण वैशिष्ट्यं आहेत. तुमच्या पत्रिकेतील बुध ग्रहाची स्थिती बलवान असल्यास काय होते ते जाणून घेऊयात.
प्रत्येक राशीनुसार एक ग्रहस्वामी असतो. जो त्या त्या व्यक्तीची ठराविक गुण वैशिष्ट्यं स्पष्ट करतो. त्याचप्रमाणे तुमच्या पत्रिकेतील बलवान ग्रह तुमच्या स्वभावातील गुण वैशिष्ट्य अधोरेखित करतो. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धीचाकारक मानलं जातं. बुद्धी, संवाद कौशल्य, तर्कशक्ती, व्यापार, आणि गणितीतज्ञ असणाऱ्या व्यक्तींचा पत्रिकेतील बुध भक्कम असतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत बुध ग्रह बलवान (भक्कम) असेल, तर त्या व्यक्तीच्या स्वभावात काही विशिष्ट गुणधर्म प्रकर्षाने दिसून येतात.
बुध भक्कम असलेली व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आणि चतुर असते. अशा व्यक्ती कोणतीही विद्या लवकर आत्मसात करतात. आयुष्यातील बदल ही माणसं इतरांच्या तुलनेत लवकर स्विकारतात. अफाट बुद्धीमत्ता असल्याने या मंडळींच्या चेहऱ्यावर कायम बुद्धीचं तेज दिसून येतं. ही माणसं आत्मविश्वासाने समाजात वावरत असतात. या व्यक्ती सतत नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी धडपडत असतात. या व्यक्तींमध्ये जिज्ञासा मोठ्या प्रमाणात दिसून येते.
बुध भक्कम असलेली व्यक्ती अत्यंत बुद्धिमान तर असतात त्याचबरोबर संवादकौशल्य देखील तितकंच अफाट असते. अशी माणसं बळंच बोलत नाही पण जेव्हा बोलतात तेव्हा त्याचा संवाद अत्यंत प्रभावी असतो. लेखन, वाचन, वकृत्व, पत्रकारिता किंवा शिक्षण क्षेत्रात त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक असते.शिवाय, बुध हा व्यापाराचा कारक ग्रह असल्यामुळे अशा व्यक्ती व्यवसायात देखील कुशल असतात. त्यांचा आर्थिक व्यवहारावर पकड असते. ते व्यवहार करताना तर्क आणि तथ्य यांच्या आधारे निर्णय घेतात, भावनांच्या आहारी वाहवत जात नाही. भावनिक नातं आणि व्यवहार या दोन्हींना वेगवेगळं ठेवणं यांना चांगलं जमतं.
अशी माणसं वास्ववादी विचारसरणीच्या असतात. म्हणूनच ते सहसा गोंधळात न पडता स्पष्ट निर्णय घेऊ शकतात.बुध जर फारच प्रभावी असेल तर कधी कधी ही मंडळी अत्यंत चपळ, हिशोबी किंवा आत्मकेंद्रित देखील होऊ शकतात. काही वेळा त्यांची तर्कशक्ती भावनांवर मात करते, त्यामुळे ते भावनिकदृष्ट्या थोडेसे दूर राहू शकतात.शा व्यक्तींना लोकांशी संवाद साधण्यात आणि नातेसंबंध जपण्यात विशेष नैसर्गिक कौशल्य असते. अनेकदा एकाच वेळी विविध गोष्टींमध्ये सामंजस्य राखणं यांना चांगलं जमतं.