सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी करा 'हे' उपाय, पितरांच्या आशीर्वादाने व्यवसायात होतील लाभ (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Pitru Amavasya 2024: हिंदू शास्त्रात पितृअमावस्येला खूप मोठ महत्त्व आहे. आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा, याकरीता पितृपक्षात श्राद्ध केलं जातं. हिंदूशास्त्रात असं सांगितलं जातं की, कृष्ण पक्षातील शेवटच्या दिवशी पितृ अमावस्या असते. या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करुन त्यांना मोक्ष मिळण्याकरीता प्रार्थना केली जाते. या वर्षी सर्वपितृ अमावस्या 2 ऑक्टोबर रोजी येत आहे.
बऱ्याचदा नोकरी व्यवसायात किंवा नातेसंबंध यांत कलह पाहायला मिळतो. प्रयत्न करुनही पाहिजे तसं यश हाती येत नाही. तेव्हा त्या व्यक्तीच्या पत्रिकेत पितृदोष असण्याची शक्यता असते असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं जातं. असं म्हणतात की, आपल्या पुर्वजांची एखादी इच्छा अपूर्ण राहिल्यास त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही.
हेही वाचा- नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत, ऑक्टोबरमध्ये सण कधी आहेत? जाणून घ्या संपूर्ण यादी
धार्मिक शास्त्रानुसार व्यवसायात प्रगती होण्याकरीता आपल्या पितरांचा आशीर्वाद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करुन गरजूंना अन्न,वस्त्र आणि आवश्यक वस्तू दान करणं पुण्याचं काम म्हटलं जातं. दान धर्म केल्याने पित्र प्रसन्न होतात. पितरांच्या आशीर्वादाने कुटुंबातील कलह दूर होतात तसंच व्यवसायात लाभ होऊन धन संपत्ती वृद्धींगत होते.
पितृुपक्षातील पंधरा दिवसात जर पितरांचं श्राद्ध करण्याचं शक्य होत नसल्यास सर्वपित्री अमावस्येतच्या दिवशी पितरांचं विधीवत श्राद्ध करणं महत्त्वाचं आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी या करीता शास्त्रशुद्ध पद्धतीने श्राद्ध केलं जातं. या दिवशी कुटुंबातील सदस्यांनी मांसाहार किंवा दारूचं सेवन करु नये असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यासोबतच नैवेद्यात कांदा आणि लसूण यांचा वापर करु नये असं देखील सांगितलं जातं.
पितृपक्षात दान धर्म केल्याने पुण्य लाभतं.त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कोणी गरजू तुमच्याकडे मदत मागत असेल तर यथाशक्तीप्रमाणे त्याला मदत करावी, असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं जातं. जर तुम्ही या दिवशी ब्राम्हणांना भोजन दिले तर ते शुभ मानले जाते.
हेही वाचा- सर्वपित्री अमावस्येला ग्रहांचे मोठे संक्रमण, सूर्यग्रहणाचा या राशींवर होणार परिणाम
त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार ब्राम्हणांना चांदीची वस्तू, वस्त्र आणि दक्षिणा द्यावी. येत्या 2 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळे ग्रहणात गरजूंना दान घर्म केल्याने पितरांचे आशीर्वाद लाभतात. अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण असलं तरी ते भारतात दिसणार नाहीा. मात्र ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहणात कुलदैवताचं नामस्मरण केल्याने कौंटुंबिक सौख्य लाभते.
(ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)